
२०२५ चा नववा महिना सप्टेंबर विशेष मानला जातोय. या महिन्यात सूर्य, चंद्र यांच्यासह इतर मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रहस्थितीतील या बदलांचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर होणार आहे. काहींसाठी हा काळ शुभ संधी घेऊन येईल, तर काहींना आव्हानांनाही सामोरे जावे लागेल. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक आयुष्य या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहांची हालचाल बदल घडवून आणेल. तर मग जाणून घ्या, सप्टेंबर २०२५ मधील तुमच्या राशीचं भविष्य आणि या महिन्यातील महत्त्वाचे शुभ-अशुभ संकेत.
मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, अन्यथा स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. मात्र, महिन्याच्या मध्यात आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो, विशेषत: खाण्यापिण्याची काळजी घ्या. पालकांच्या आरोग्यामुळे धावपळ करावी लागेल. व्यवसाय आणि प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल राहील.
वृषभ राशीचे लोक या महिन्यात प्रवासाला जाऊ शकतात. नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदी वेळ मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील ध्येय साध्य करता येईल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. मात्र, कोणत्याही प्रकारचा धोका घेऊन गुंतवणूक टाळावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला राहील.
या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल नाही. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे त्रास वाढू शकतो व रुग्णालयाचे चकरा माराव्या लागू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी अभ्यासासोबत चांगल्या नोकरीच्या शोधात राहतील.
कर्क राशीचे लोक धार्मिक यात्रेला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष शुभफलदायी ठरेल. जोडीदाराकडून काहीतरी आनंददायक घडेल. तरुणांना आपल्या ध्येयात यश मिळेल. आहारात निष्काळजीपणा टाळा, अन्यथा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर चांगली कामं अडकण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांनी एकतर्फी प्रेमसंबंध टाळले पाहिजेत, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्याच्या तब्येतीमुळे तणाव येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना अनिच्छेने प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायिकांना नफा मिळण्याच्या संधी आहेत. आर्थिक लाभाचे योगही तयार होतील.
कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात लहान प्रवास करावा लागू शकतो, परंतु अपेक्षित लाभ मिळणार नाही. पोटाचे आजार त्रासदायक ठरू शकतात. करिअर, नोकरी, शिक्षण आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांत यश मिळू शकेल. नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात वेळ जाईल. एखाद्याला मदत केल्याने समाधान लाभेल.
तूळ राशीसाठी हा महिना करिअरच्या दृष्टीने चांगला ठरेल. मनासारखा आहार मिळाल्याने आनंद होईल. नोकरी व व्यवसायातील लोकांना यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबासोबत आनंदी वेळ मिळेल. पालकांच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी मोठे निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावेत, अन्यथा पश्चात्ताप होऊ शकतो. आर्थिक बाबतीत ताण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना लाभ होईल आणि करिअरमध्ये नवीन यश मिळेल. मात्र, हंगामी आजार त्रास देऊ शकतात. जोडीदारासोबत छोट्या वाद-विवादाची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना संतती, शिक्षण, गुंतवणूक आणि आरोग्यासाठी अनुकूल ठरेल. नवीन ठिकाणी फिरायला जाण्याची संधी मिळेल. आपल्या छंदांना वेळ देता येईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. आरोग्य सुधारेल. कोणतेही काम सुरू केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठीही वेळ चांगला आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना भावनिक ठरेल. एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर रहावे लागेल. करिअरच्या दृष्टीने संधी अनुकूल आहेत. जोडीदारासाठी वेळ देता येईल. नोकरी व व्यवसाय दोन्हीत यश मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. मात्र, आईच्या आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो.
कुंभ राशीच्या लोकांना या महिन्यात अनेक चांगल्या बातम्या मिळतील. भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. नवीन लोकांशी भेट फायदेशीर ठरेल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत अधिकारी समाधानी राहतील. जुने वाद मिटतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. फायदेशीर करार होतील. नोकरीत बढती किंवा इच्छित बदली मिळण्याची शक्यता आहे. घर, दुकान किंवा मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. प्रेमजीवन आनंददायी राहील. नियोजित कामं वेळेत पूर्ण होतील.