वास्तू शास्त्रानुसार घरात हवा, प्रकाश आणि योग्य रंगांचा वापर केल्यास पॉझिटिव्ह एनर्जी येते. मुख्य दरवाजा, फर्निचरची मांडणी आणि पंचमहाभूतांचा समतोल राखून तुम्ही घरात सुख-शांती आणि नशीब वाढवू शकता.
घरात फर्निचर ठेवण्याची जागाही एनर्जीवर परिणाम करते. अस्ताव्यस्त घर मानसिक ताण वाढवते.
सोफा आणि पलंग भिंतीला लागून ठेवा.
घराचा मध्यभाग रिकामा सोडा. यामुळे एनर्जी सहज फिरते.
पलंगासमोर आरसा ठेवू नका. यामुळे झोपमोड होते.
घर नेहमी स्वच्छ ठेवा. यामुळे नशीब उजळते!
59
5. निसर्गाचे घटक घरात आणा
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश - या पंचमहाभूतांचा घरात समावेश असेल तर एनर्जी बॅलन्स राहते.
झाडे पृथ्वीचे प्रतीक आहेत. दरवाजाजवळ मनी प्लांट किंवा तुळस ठेवा.
पाण्याच्या बाऊलमध्ये फुले ठेवणे समृद्धीचे प्रतीक आहे.
मेणबत्त्या किंवा दिवे अग्नीचे प्रतीक आहेत. हे घरात चैतन्य आणतात.
विंड चाईम्स किंवा घंटा वायूचे प्रतीक आहेत. यामुळे घरात शांतता येते.
69
6. किचन आणि बेडरूमची वास्तू
घरात किचन आणि बेडरूम खूप महत्त्वाचे असतात. इथली वास्तू योग्य असेल तर आरोग्य आणि नाती चांगली राहतात.
किचन: गॅस शेगडी आग्नेय दिशेला असावी. सिंकसमोर शेगडी ठेवू नका.
बेडरूम: दक्षिण किंवा पूर्वेकडे डोके करून झोपा. झोपताना मोबाईल आणि लॅपटॉप दूर ठेवा.
79
7. खडे आणि चिन्हांचा वापर करा
निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आणि समृद्धी आणण्यासाठी वास्तूमध्ये खडे (क्रिस्टल्स) आणि पवित्र चिन्हांचा वापर करतात.
अॅमेथिस्ट (Amethyst) खडा शांतता देतो. तो बेडरूममध्ये ठेवा.
सिट्रीन (Citrine) खडा पैसा आकर्षित करतो. तो पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा.
दरवाजाजवळ ओम किंवा स्वस्तिक चिन्ह लावल्यास पॉझिटिव्हिटी येते.
89
8. ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा
वास्तूमध्ये ईशान्य दिशा खूप पवित्र मानली जाते. हे ज्ञान आणि शांततेचे प्रतीक आहे.
ही जागा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान राहील याची काळजी घ्या.
इथे जड फर्निचर किंवा टॉयलेट नसावे.
इथे पाण्याचे छोटे कारंजे किंवा ध्यान करण्यासाठी जागा बनवली तर खूप चांगले.
99
मॉडर्न वास्तू
मॉडर्न वास्तू म्हणजे कडक नियम नाहीत. हा घर आणि निसर्ग यांच्यात ताळमेळ बसवण्याचा एक प्रयत्न आहे. योग्य प्रकाश, स्वच्छ घर आणि फर्निचरची योग्य मांडणी यांसारखे छोटे बदल तुमच्या घरातील एनर्जी आणि तुमचे आरोग्य सुधारतात.
Disclaimer - ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. एशियानेट न्यूज याला दुजोरा देत नाही.