
Idli-Pizza Recipe : इडली बनवल्यानंतर अनेकदा पीठ उरतंच. मग आपण त्याचं एकतर डोसा बनवतो किंवा आप्पे-उत्तपा करतो. पण आता तुम्ही याच उरलेल्या पिठापासून एक भन्नाट फ्युजन डिश बनवू शकता, तिचं नाव आहे 'पिझ्झा इडली शकशुका'. ही रेसिपी फक्त २० मिनिटांत तयार होते आणि याची चव इतकी भारी आहे की तुम्ही मोठ्या रेस्टॉरंटची चवही विसराल. चला तर, एका व्हायरल व्हिडिओमधून पाहूया की ही पिझ्झा इडली शकशुका कशी बनवायची.
इन्स्टाग्रामवर शेफ नेहा दीपक शाह यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उरलेल्या इडली पिठाचा वापर करून पिझ्झा इडली शकशुका कसा बनवायचा हे दाखवलं आहे. ही व्हायरल रेसिपी फक्त २० मिनिटांत तयार होते. तुम्ही ही डिश नाश्त्याला, जेवणात किंवा डिनरमध्ये कधीही खाऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल. यासाठी तुम्हाला खालील साहित्य लागेल:
ही डिश बनवण्यासाठी, सगळ्यात आधी एका पॅनमध्ये थोडं बटर गरम करा. त्यात कांदा घालून हलका परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो मधून कापून पॅनमध्ये ठेवा. तुम्ही यात थोडा लसूणही घालू शकता. ५ ते ७ मिनिटं शिजवल्यानंतर हे मिश्रण मॅश करा. टोमॅटोची जाड साल काढून टाका. आता त्यात चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि पिझ्झा सिझनिंग घालून चांगलं शिजवा. थोडं पाणी घालून सॉसची कन्सिस्टन्सी बॅलन्स करा. आता या पिझ्झा सॉसमध्ये पळीच्या मदतीने इडलीचं पीठ २-३ ठिकाणी थोड्या-थोड्या अंतरावर सोडा. पॅनवर झाकण ठेवून १० मिनिटं शिजवा. वरून भरपूर चीज घाला आणि एक-दोन मिनिटं आणखी शिजू द्या. गरमागरम सर्व्ह करा. हा पिझ्झा-इडली शकशुका इतका चविष्ट लागतो की लहान मुलं आणि मोठेही पुन्हा-पुन्हा खाण्याची मागणी करतील.
इडलीचं पीठ तयार करण्यासाठी तीन कप जाड तांदूळ आणि एक कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी थोडं पाणी घालून ते बारीक वाटून घ्या. हवं असल्यास तुम्ही त्यात थोडे पोहेही घालू शकता. यामुळे इडलीचं पीठ मऊ होतं आणि लवकर फर्मेंट (आंबायला) मदत होते.