१५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या दिवशी एक विशेष खगोलीय घटना घडली आहे. बुध आणि गुरु ग्रह एकमेकांपासून १०८ अंशाच्या कोनात आले आहेत. यामुळे 'त्रिदशांश' नावाचा शुभ योग तयार झाला आहे. हा योग ब्रह्म मुहूर्ताच्या थोडा वेळ आधी, पहाटे ३:०३ वाजता तयार झाला आहे. यामुळे, पुढील काही दिवस तीन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहेत. त्या भाग्यवान राशींबद्दल या लेखात पाहूया.