Published : Jun 26, 2025, 05:22 PM ISTUpdated : Jun 26, 2025, 05:23 PM IST
कोलकाता - २७ जून २०२५ म्हणजेच शुक्रवारी जगन्नाथ रथयात्रा आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी खास ज्योतिष सल्ले पाळल्यास जगन्नाथ देवाची कृपा मिळते, असे म्हटले जाते. तर जाणून घ्या काय सांगितले आहे…
जगन्नाथ रथयात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक वर्षी जगन्नाथ रथयात्रेचे वेगळे स्वरुप असते. यावर्षी रथयात्रा शुक्रवार २७ जून २०२५ रोजी निघणार आहे. त्यासाठी जगभरातील भाविक ओडिशात दाखल झाले आहेत. रथयात्रा कधी सुरु होणार याची ते आतुरतेने वाट बघत आहेत.
210
द्वितीया तिथी २६ जून, दुपारी १.२४ पासून सुरू होईल
दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी द्वितीया तिथी २६ जून, दुपारी १.२४ पासून सुरू होईल. द्वितीया तिथी २७ जून, सकाळी ११.१९ मिनिटांनी संपेल. या वेळेलाही ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. हा वेळ काही भाविक काटेकोरपणे पाळतात.
310
महेंद्रयोग सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून
यावर्षी महेंद्रयोग सकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत आणि सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल. यात्रेच्या पूर्वी केले जाणारे रितीरिवाज सध्या पार पाडले जात आहेत.
या रथयात्रेच्या दिवशी विशेष ज्योतिष सल्ले पाळले जातात. यावेळी घरात सुख आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. त्यामुळे तुमच्या घरावरील कृपादृष्टी कधीही दूर होणार नाही. संकटे तुमच्या जवळही येणार नाहीत.
510
१ रुपयाचे एक नाणे ठेवा
घरात नारायण असेल तर त्यांच्यासमोरही जगन्नाथचा व्रत पाळू शकता. त्यासाठी जगन्नाथ पुरीला भेट देण्याची गरज नाही. एका पितळेच्या वाटीत थोडे अतप तांदूळ घ्या, थोडी कच्ची हळद टाका आणि १ रुपयाचे एक नाणे ठेवा.
610
रथयात्रेचा दिवस अत्यंत शुभ
गृहप्रवेशाचा दिवस म्हणून रथयात्रेचा दिवस अत्यंत शुभ असतो. या दिवशी नव्या घरात प्रवेश केला जातो. जगन्नाथ रथयात्रेचा दिवस शुभ असल्याने या दिवशी महत्त्वाची शुभ कार्येही पार पाडली जातात.
710
भूमीपूजनाचा दिवस म्हणून हा दिवस शुभ
गृहप्रवेशाप्रमाणेच भूमीपूजनाचा दिवस म्हणून हा दिवस शुभ असतो. आजकाल कोलकातासह राज्यातील विविध मोठ्या बारावारी दुर्गापूजेची खांबपूजाही या दिवशी केली जाते. त्यामुळे भूमीपूजन करायचे असल्यास या दिवसाची निवड केल्यास उत्तम राहिल.
810
वृक्षारोपण करू शकता
या दिवशी वृक्षारोपण करू शकता. हा दिवस वृक्षारोपणासाठी शुभ दिवस आहे. या दिवशी लावलेल्या झाडांमुळे सृष्टीत आनंदाचे वातावरण राहते. झाड लावणार्याचे नशीब बहरते असे समजले जाते.
910
गंगास्नान केल्याने पुण्य मिळते
कोणत्याही पुण्यतिथीला गंगास्नान केल्याने पुण्य मिळते. त्याप्रमाणे रथयात्रेच्या दिवशीही गंगासनान करू शकता. या दिवशी लाखो भाविक गंगास्नान करतात. त्यामुळे देवाची कृपा होते असे म्हटले जाते.
1010
जगन्नाथ स्वामी, नयन पथगामी, भवतु मे
जगन्नाथ मंत्र जप केल्यानेही पुण्य होते. मंत्र असा आहे: जगन्नाथ स्वामी, नयन पथगामी, भवतु मे. या मंत्राचा जप करा. तुमचे कल्याण होईल, असे सांगितले जाते. हा मंत्र अत्यंत ऊर्जादायी आहे.