ब्लॅक ब्युटी म्हणून करीना आणि निळ्या रंगात सुहाना आल्या, तर लाल रंगाच्या पोशाखात कियाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईशा अंबानी यांनी स्थापन केलेले ब्युटी स्टोअर 'तिरा' हे खरेदीच्या अनुभवात सर्वोच्च स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून आहे.
जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये रिलायन्सच्या अग्रगण्य लक्झरी ब्युटी स्टोअर 'तिरा'च्या उद्घाटनाप्रसंगी ईशा अंबानी यांनी केलेल्या जलव्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इटालियन फॅशन डिझायनर जॉर्जियो अर्मानी यांनी डिझाइन केलेल्या लॅव्हेंडर रंगाच्या साटन सूटमध्ये ईशा आपल्या 'तिरा'च्या उद्घाटनासाठी आल्या होत्या.
चमकदार साटन फॅब्रिकमध्ये हा सूट डिझाइन करण्यात आला होता. सूटचा कॉलर हा त्याचा मुख्य आकर्षण होता. हा पोशाख क्लासिक लूक देतोच, पण तो फॅशन स्टेटमेंटही आहे, असे फॅशनविश्वातील जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, बॉलिवूडमधील फॅशनिस्ता आणि ब्रँड अँबेसेडर करीना कपूर, कियारा अडवाणी आणि सुहाना खान यांनी 'तिरा'चे उद्घाटन केले. ब्लॅक ब्युटी म्हणून करीना आणि निळ्या रंगात सुहाना आल्या, तर लाल रंगाच्या पोशाखात कियाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईशा अंबानी यांनी स्थापन केलेले ब्युटी स्टोअर 'तिरा' हे खरेदीच्या अनुभवात सर्वोच्च स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक स्टोअर्स असलेल्या 'तिरा'ने ऑनलाइन खरेदीद्वारे १०० हून अधिक शहरांमध्ये आपला विस्तार केला आहे.