Health Tips : अलार्मशिवाय जागं व्हायचंय? मग 'या' सोप्या सवयी लावा, रोज सकाळी वेळेवर उठाल

Published : Aug 25, 2026, 11:03 PM IST
Health Tips : अलार्मशिवाय जागं व्हायचंय? मग 'या' सोप्या सवयी लावा, रोज सकाळी वेळेवर उठाल

सार

Wake Up Without an Alarm : आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला 'सर्केडियन रिदम' म्हणतात. हे घड्याळ जर आपण व्यवस्थित सेट केलं, तर अलार्मच्या कर्कश आवाजाशिवायही आपल्याला रोज सकाळी वेळेवर जाग येऊ शकते.

मुंबई : रोज सकाळी अलार्मच्या कर्कश आवाजाने जाग येणं कुणाला आवडतं? पण वेळेवर उठायला पर्याय नसतो. मात्र, काही सोप्या सवयी लावून घेतल्यास तुम्ही अलार्मशिवायही नैसर्गिकरित्या वेळेवर उठू शकता. यासाठी फक्त तुमच्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ, म्हणजेच 'सर्केडियन रिदम' (Circadian Rhythm) व्यवस्थित सेट करण्याची गरज आहे. जाणून घ्या कसं?

रोज एकाच वेळी उठा

सुट्टीचा दिवस असो किंवा कामाचा, रोज एकाच वेळी उठण्याचा नियम करा. वीकेंडला जास्त वेळ झोपण्याचा मोह टाळा. यामुळे तुमच्या शरीराला एक निश्चित लय सापडते आणि ते त्याच वेळेनुसार सेट होतं.

पुरेशी झोप घ्या

जर तुमची झोपच पूर्ण झाली नाही, तर शरीर वेळेवर उठायला तयार होणार नाही. एका प्रौढ व्यक्तीला रोज रात्री किमान ७ तास शांत झोप मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कंजूसी किंवा हलगर्जीपणा करू नका.

सकाळी कोवळं ऊन घ्या

सकाळी उठल्याबरोबर खिडक्या उघडा किंवा थोडा वेळ बाल्कनीत/बाहेर जाऊन कोवळं ऊन घ्या. सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्या शारीरिक लय किंवा सर्केडियन रिदमला चालना देतो. यामुळे तुम्हाला रात्री वेळेवर झोप यायलाही मदत होते.

रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीन आणि प्रकाश टाळा

झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बंद करा. खोलीतला प्रखर प्रकाशही टाळा. याऐवजी तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता किंवा शरीराला आराम देणारे हलके व्यायाम करू शकता.

खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या

दुपारनंतर चहा किंवा कॉफी पिणं टाळा. रात्री उशिरा जेवणं, खूप तेलकट-तिखट खाणं आणि मद्यपान करणं या सवयी तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब करतात. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी जास्त मेहनतीचे व्यायाम करणंही टाळावं.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Cloves Benefits : उशीखाली लवंग ठेवून झोपलात तर काय होतं?