आजकाल सगळ्यांचे जीवन धकाधकीचे झाले आहे. ऑफिस आणि घरकामामुळे अनेक जण तणावाखाली येत आहेत. त्यांना नीट जेवण बनवून खाण्यासही वेळ मिळत नाही. फास्ट फूडचे व्यसन वाढत आहे. पण, पूर्वी असे नव्हते. आपल्या आई, आजी स्वयंपाक करताना एका पद्धतीने स्वयंपाक करायच्या. स्वयंपाक करण्यापूर्वी किमान एक तास आधी तांदूळ, डाळ इत्यादी भिजवून ठेवायच्या. नंतरच स्वयंपाक करायच्या. भिजवल्याने स्वयंपाक करणे सोपे होते म्हणून त्या असे करायच्या असे आपण समजतो. पण, असे भिजवून खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे का?