घरात सोफा लवकरच खराब होतो. पण तो स्वच्छ कसा करायचा, हे अनेकांना माहीत नसतं. पाण्याने धुतल्यास सोफा खराब होईल, अशी भीती वाटते. खरं तर, पाणी न वापरताही सोफा स्वच्छ करता येतो.
घरातील सोफ्यावर काही दिवसांतच धूळ आणि डाग साचतात. लहान मुलांनी सांडलेले अन्न, चहा-कॉफीचे डाग आणि घामामुळे सोफा लवकर खराब होतो. फॅब्रिक सोफ्यावरील डाग काढणे थोडे कठीण असते. त्यांना स्वच्छ करण्यासाठी जास्त पाणी वापरल्यास आतील फोम ओला होऊन दुर्गंधी येऊ शकते. पण पाणी न वापरता सोफा स्वच्छ करता येतो. यासाठी सोफ्याखाली किंवा मागे दिलेले केअर लेबल वाचावे. त्यात स्वच्छतेची पद्धत दिलेली असते. त्यानंतर सोफ्याचे कुशन बाजूला काढून व्हॅक्यूम क्लिनरने धूळ, केस आणि अन्नाचे कण काढावेत. कोपऱ्यातील धूळ काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरच्या बारीक नोझलचा वापर करा.
23
बेकिंग सोडा वापरा
पाण्याशिवाय सोफा स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयोगी पडतो. सर्वप्रथम सोफ्यावर बेकिंग सोडा हलकासा शिंपडा आणि सुमारे 20 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर मऊ ब्रशने हळूवारपणे स्वच्छ करा आणि व्हॅक्यूम क्लिनरने पावडर पूर्णपणे काढून टाका. यामुळे धूळ आणि थोडी दुर्गंधी कमी होईल. बाजारात मिळणाऱ्या फॅब्रिक ड्राय क्लिनिंग पावडरचाही वापर करता येईल. मात्र, सोफ्याचा रंग उडू नये म्हणून आधी न दिसणाऱ्या छोट्या भागावर त्याची चाचणी करा. चहा किंवा कॉफीचे डाग पडल्यास लगेच कोरड्या कापडाने पुसून काढा. जोरात घासू नका. तेलाच्या डागांवर थोडा बेकिंग सोडा शिंपडून काही वेळानंतर व्हॅक्यूम करा.
33
या गोष्टी करू नका
सोफा स्वच्छ करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. ब्लीच, कडक डिटर्जंट आणि कडक ब्रश वापरू नका. यामुळे सोफ्याचा रंग उडण्याची शक्यता असते. मखमली (वेल्वेट) आणि स्वेडसारख्या नाजूक फॅब्रिकची अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छता करावी. सोफ्यावर जास्त पाणी ओतणे किंवा डाग जोरात घासणे योग्य नाही. गरज पडल्यास थोड्या ओल्या मायक्रोफायबर कापडाने छोटे भाग पुसावेत. नंतर कोरड्या टॉवेलने ओलावा काढून पंख्याच्या हवेत सुकवावे. आठवड्यातून एकदा व्हॅक्यूम करणे आणि डाग पडल्यास लगेच साफ करण्याची सवय लावल्यास सोफा जास्त काळ नवीन दिसेल. दर सहा महिन्यांनी डीप क्लिनिंग करणे चांगले.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.