Diwali 2026 Astrology : 2026 च्या दिवाळीत जुळून येतोय महायोग; या 4 राशींना लागणार जॅकपॉट

Published : Nov 05, 2026, 12:34 PM IST

दिवाळीच्या दिवशी शुक्रादित्य आणि बुधादित्य योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या दुर्मिळ योगामुळे मेष राशीसह ४ राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होणार आहे.

PREV
15
काही राशींना नवीन नोकरी, व्यवसायात मोठं यश आणि बक्कळ पैसा

८ नोव्हेंबर २०२६, रविवारी दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी स्वाती नक्षत्रासोबत आयुष्मान आणि सौभाग्य योग जुळून येत आहेत. तूळ राशीत सूर्य आणि शुक्र एकत्र आल्याने शुक्रादित्य योग तयार होतोय. सोबतच सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योगही तयार होईल. यामुळे काही राशींना नवीन नोकरी, व्यवसायात मोठं यश आणि बक्कळ पैसा मिळणार आहे.

25
मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. खूप दिवसांपासून रखडलेले मालमत्तेचे वाद सहज सुटतील. लग्नाच्या बोलणीला यश येईल. पैशांच्या बाबतीतही तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.

35
तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. तुमची सगळी पेंडिंग कामं पूर्ण होतील आणि नवीन संधी चालून येतील. घरात आनंदाचं वातावरण असेल. दिवाळीच्या काळात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल.

45
धनू

धनू राशीच्या लोकांना या काळात मोठा मान-सन्मान आणि यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं चांगलं कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्यांना बक्कळ नफा मिळेल. स्वतःचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. नवीन बिझनेसच्या संधींमधून भविष्यात चांगला फायदा होईल.

55
मीन

मीन राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप लकी ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नवरा-बायकोमधील प्रेम आणि विश्वास आणखी वाढेल. तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होतील. कुटुंबासोबत मजेत वेळ घालवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories