रात्री झोपताना चेहऱ्यावर चादर किंवा ब्लॅंकेट घेता का? तुम्ही खूप मोठा धोका पत्करताय!

Published : Dec 06, 2025, 07:07 PM IST

Dangers of Covering Face While Sleeping : आपल्यापैकी अनेकजण रात्री झोपताना चादर पांघरतात. विशेषतः चेहऱ्यावरही चादर ओढून घेतात. पण, ही सवय खूप धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 

PREV
13
चादर घेतल्याशिवाय झोप येत नाही

थंडीच्या दिवसात बहुतेक सर्वजण चादरीशिवाय झोपू शकत नाहीत. थंडीपासून वाचण्यासाठी चादर आवश्यकच असते. चादर पांघरल्याने शरीराला उब मिळते. शांत झोपही लागते. पण, अनेकजण चेहऱ्यावरही चादर ओढून घेतात. पण.. असं चेहऱ्यावर चादर ओढून झोपणं चांगलं आहे का? की आरोग्यासाठी धोकादायक? तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहूया....

चेहऱ्यावर चादर घेतल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही, असं अनेकजण म्हणतात. हे खूप सामान्य वाटू शकतं. पण, यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

23
ऑक्सिजनची कमतरता... कार्बन डायऑक्साइडमध्ये वाढ...

जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आणि डोकं पूर्णपणे चादरीने झाकून झोपता, तेव्हा शरीराला पुरेशी ताजी हवा किंवा ऑक्सिजन मिळत नाही. तुम्ही सोडलेला कार्बन डायऑक्साइड चादरीच्या आतच अडकून राहतो. परिणामी... तोच कार्बन डायऑक्साइड जास्त प्रमाणात श्वासावाटे आत घेतला जातो. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढते. त्यामुळे गुदमरल्यासारखं वाटू शकतं आणि झोपेत अडथळा येऊ शकतो. शेवटी सकाळी उठल्यावर खूप थकल्यासारखं वाटतं.

33
शरीराचे तापमान वाढते...

चेहऱ्यावर चादर किंवा बेडशीट घेऊन झोपल्यामुळे तापमान वाढतं. थंडीच्या दिवसात रात्री झोपण्यासाठी शरीराला तापमानाची गरज असतेच. पण.. जास्त उष्णतेमुळे... घाम येतो. झोपूनही आराम केल्यासारखं वाटत नाही. अस्वस्थ वाटतं. दुसर्या दिवशी तब्येत खराब झाल्यासारखे वाटते.

झोपेची गुणवत्ता कमी होते...

अशाप्रकारे चेहरा पूर्णपणे चादरीने झाकल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते, झोपेत अडथळा येतो आणि गुदमरल्यासारखं वाटतं. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप आवश्यक आहे. म्हणूनच, ही चूक करू नये. रोज असं केल्यामुळे एकाग्रता कमी होते. चिडचिड वाढते. इतर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे.. ही चूक करू नये. काहीजण तर चेहऱ्याला मास्क लावून झोपतात. ती चूकही करू नये.

ही सवय कशी बदलावी..?

जर तुम्हाला चेहऱ्यावर चादर घेतल्याशिवाय झोप येत नसेल.... तर एक छोटी युक्ती वापरा. पूर्णपणे चेहरा न झाकता.. किमान अर्धा चेहरा झाका. विशेषतः नाकाला श्वास घेण्यास अडथळा होईल असं झाकू नका. हवा खेळती राहील अशाप्रकारे चादर घ्या.

Read more Photos on

Recommended Stories