Daily Horoscope 16 August 2026 : काहींना अचानक आर्थिक लाभ, तर काहींना नोकरीत फायदा; १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

Published : Aug 16, 2026, 10:24 AM IST

रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी अमृतसिद्धी, सर्वार्थसिद्धी, मानस, पद्म, साध्य, शुभ अशा ६ शुभ योगांचा संयोग आहे. या दिवशी ग्रहांच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही; सर्व ग्रह सध्याच्याच स्थितीत राहतील. जाणून घ्या प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा असेल?

PREV
112
मेष

तुमच्या नम्र स्वभावाने तुम्ही सर्वांची मनं जिंकाल. मित्राचा सल्ला कामाचा, फायदेशीर ठरू शकतो. प्रवासात काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

212
वृषभ

काही खास व्यक्तींची भेट होऊ शकते. मालमत्तेबाबत चांगली बातमी मिळू शकते. खर्च वाढतील, त्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

312
मिथुन

आर्थिकदृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात. घरात आनंदाचं वातावरण राहील. कौंटुंबिक गोष्टींवर पैसे खर्च कराल. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.

412
कर्क

धार्मिक किंवा एखाद्या शुभ कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षा, करिअरबाबतीत चांगले शुभ संकेत मिळतील. तुमच्या मुलांना चांगलं यश मिळेल, त्याने आनंद वाटेल. इतरांमध्ये सामाजिक दर्जा वाढेल.

512
सिंह

नव्या सुरुवातीसाठी आजचा दिवस चांगला आहे. काम जे काही हाती घ्याल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इतरांना मदत करा, त्याने मानसिक समाधान मिळेल.

612
कन्या

बोलताना काळजी घ्या, तुमचे शब्द जपून वापरा. संयम ठेवल्यास परिस्थिती सामान्य होण्यास मदत होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मन आनंदी राहील. घरात प्रेमाचं वातावरण राहील.

712
तुळ

वैवाहित जीवनात मतभेद होऊ शकतात, संयम ठेवा. नशीबाची साथ मिळेल, रखडलेली कामं पूर्ण होतील. जुनी एखादी गुंतवणूक केली असेल. तर त्यातून नफा मिळेल.

812
वृश्चिक

नोकरदारवर्गाला नवी संधी मिळेल. पण निर्णय घेण्याआधी विचार करा. घरातील खर्च वाढू शकतो. तुमच्या स्वत:वर विश्वास ठेवा. इतरांच्या बोलण्यातून कोणताही निर्णय घेऊ नका.

912
धनु

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. स्पर्धा, परीक्षांमध्ये यश मिळेल. व्यवसायात बदल होऊ शकतात, पण त्याचा फायदाच होईल. कुटुंबात सहल होऊ शकते.

1012
मकर

मालमत्तेबाबत सावधगिरी बाळगा. कागदपत्रांची तपासणी करुनच पुढील निर्णय घ्या. भावंडांसोबतचे मतभेद संपतील. नोकरीत, व्यवसायात सुधारणा होईल.

1112
कुंभ

तुमच्या मेहनतीचं यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील, सुसंवाद घडेल. प्रवास घडेल. इतरांच्या कामात उगाच मध्ये पडू नका.

1212
मीन

आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल, आनंदी वातावरण राहील. आयुष्यातील पुढील योजनांवर चर्चा कराल. नोकरदारवर्गाला चांगली बातमी मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Read more Photos on

Recommended Stories