
पंचांगकर्ते फणीकुमार यांनी आजचे राशीभविष्य सांगितले आहे. आज कोणत्या राशीच्या नशिबात काय लिहिले आहे, ते आपण सविस्तर पाहूया.
तुम्ही आज देवदर्शनाला जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. नोकरी आणि व्यवसायात दिवस सामान्य राहील. आरोग्याच्या तक्रारी सतावू शकतात. कुटुंबात छोटे वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती थोडी चिंताजनक राहील.
मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. जवळच्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी समजेल. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण कराल. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील.
तुमची काही महत्त्वाची कामे आज लांबणीवर पडतील. कुटुंबातील वादांमुळे मनस्ताप होऊ शकतो. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. खूप मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळणार नाही. नोकरी आणि व्यवसायात अचानक बदल दिसतील.
नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्यात तुम्हाला रस वाटेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात चांगला नफा होईल. राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी ओळखी वाढतील. घरात एखादी अनपेक्षित पण चांगली घटना घडेल.
तुम्ही आज तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. बिझनेस पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. महत्त्वाची कामे खूप कष्ट केल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांची निराशा होऊ शकते. उत्पन्नाचे मार्ग मंदावतील. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कामे रखडतील.
जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे जा. तुम्ही आज नवीन कामांची सुरुवात कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात अतिशय अनुकूल वातावरण राहील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद मिळेल.
विद्यार्थ्यांना आज नवीन संधी मिळतील. तुमचा व्यवसाय आणि नोकरी सुरळीत चालेल. बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश नक्की मिळेल. कुटुंबासोबत शुभकार्यात सहभागी व्हाल.
किरकोळ आजार तुम्हाला सतावू शकतात. कुटुंबात तणावाचे वातावरण राहील. महत्त्वाच्या कामांमध्ये फक्त मेहनत दिसेल, पण फळ मिळणार नाही. नोकरी-व्यवसायात थोडे नुकसान सहन करावे लागेल. कामात विलंब होईल. आर्थिक बाबतीत निराशा पदरी पडेल.
मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी मिळवण्याचे प्रयत्न थोडे मंदावतील. नोकरी आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे चालतील. कुटुंबातील सदस्यांसोबत छोटे वाद होऊ शकतात. अध्यात्माकडे कल वाढेल. पैशांच्या बाबतीत कुणालाही शब्द देऊ नका.
तुम्ही हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण कराल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जवळच्या व्यक्तींकडून महत्त्वाची माहिती मिळेल. घरात शुभकार्यांचे आयोजन होईल. नोकरी-व्यवसायात उत्साह राहील. नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल. आर्थिक प्रगती होईल.
अडचणीच्या वेळी जवळच्या व्यक्तींची मदत मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामातील तुमची मेहनत फळाला येईल. नवीन कामांचा श्रीगणेशा कराल. नोकरीत तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. मुलांचे शिक्षण आणि नोकरीबाबत आनंदाची बातमी मिळेल.
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक काही प्रवास करावे लागतील. कोणत्याही कामात घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यवसाय वाढवण्याचे तुमचे प्लॅन्स सध्या लांबणीवर पडतील.