या वर्षी दुसरं चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसेल. ब्लड मून पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. आकाशात दिसणारं हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण काहींसाठी अशुभ ठेलेलं आहे. हे ग्रहण कुंभ राशीतील शतभिषा नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे काही राशी आणि काही नक्षत्रांच्या लोकांवर याचा जास्त परिणाम होईल.