Potato Power: फक्त ८ मिनिटं उकळा, एका बटाट्यावर महिनाभर घर उजळवा!

Published : Mar 15, 2026, 03:35 PM IST
Boiled Potato Battery A Low Cost Energy Solution for a Month

सार

Boiled Potato Battery A Low Cost Energy Solution for a Month: एका बटाट्यापासून वीज तयार करता येते, हे आता संशोधनातून सिद्ध झालं आहे. वीज नसलेल्या गावांमध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीत हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. रॉकेलच्या दिव्यांपेक्षाही स्वस्त आणि सुरक्षित असलेल्या या 'बटाटा बॅटरी'मागे नेमकं काय विज्ञान आहे, चला जाणून घेऊया.

Boiled Potato Battery A Low Cost Energy Solution for a Month: आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी एक सामान्य भाजी जगाच्या ऊर्जा समस्येवर उपाय ठरू शकते, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? हो, हे खरं आहे. आपण फक्त खाण्यासाठी वापरत असलेल्या बटाट्यापासून चक्क घर उजळेल एवढी वीज तयार करता येते. इस्रायलच्या जेरुसलेम हिब्रू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बटाट्याचा वापर करून अत्यंत कमी खर्चात वीज मिळवणारं 'ग्रीन बॅटरी' (Green Battery) तंत्रज्ञान जगासमोर आणलं आहे. या प्रयोगामागचं थक्क करणारं सत्य आणि त्याची कार्यपद्धती आपण समजून घेऊया.

बटाटा बॅटरीमागे नेमकं विज्ञान काय?

बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या वीज साठवलेली नसते. उलट, तो एक 'इलेक्ट्रोलाइट' (Electrolyte) म्हणून काम करतो. इलेक्ट्रोलाइट म्हणजे एक असं माध्यम जे रासायनिक प्रक्रियेला मदत करतं. बटाट्यामध्ये असलेल्या फॉस्फोरिक ॲसिडमुळे (Phosphoric Acid) दोन वेगवेगळ्या धातूंमध्ये रासायनिक क्रिया घडवून आणण्यासाठी एक पूल तयार होतो.

हे तंत्रज्ञान काम कसं करतं?

ही बॅटरी बनवण्यासाठी बटाट्याच्या एका बाजूला झिंक (Zinc) म्हणजेच जस्ताचा मुलामा दिलेला खिळा आणि दुसऱ्या बाजूला तांब्याचं (Copper) नाणं टोचलं जातं. इथे झिंक 'ॲनोड' (निगेटिव्ह टोक) आणि तांबं 'कॅथोड' (पॉझिटिव्ह टोक) म्हणून काम करतं. या दोघांमध्ये रासायनिक क्रिया (Redox Reaction) सुरू झाली की, झिंकमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडून तांब्याकडे वाहू लागतात. इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहामुळे वीज तयार होते आणि छोटा एलईडी बल्ब किंवा डिजिटल घड्याळ चालू शकतं.

उकडलेला बटाटा जास्त पॉवरफुल का?
या संशोधनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कच्च्या बटाट्यापेक्षा ८ मिनिटं उकडलेला बटाटा तब्बल १० पट जास्त ऊर्जा देतो. बटाटा पाण्यात उकळल्यामुळे त्याच्या आतल्या पेशींची रचना (Cell membranes) मोडते. यामुळे बटाट्याचा आतला विरोध (Internal Resistance) खूप कमी होतो. परिणामी, इलेक्ट्रॉनचा प्रवाह सहजपणे वाहतो आणि जास्त वीज तयार होते.

या तंत्रज्ञानाचे फायदे काय?
खूप कमी खर्च
बाजारात मिळणाऱ्या सामान्य लिथियम किंवा AA बॅटरीपेक्षा हा उपाय जवळपास ५० पट स्वस्त आहे.

जास्त काळ टिकते
जर बटाट्याच्या चकत्या योग्य पद्धतीने एकत्र जोडल्या, तर एका खोलीला महिनाभर (३० दिवसांपेक्षा जास्त) पुरेल एवढा प्रकाश मिळू शकतो.

पूर्णपणे सुरक्षित
दुर्गम भागांमध्ये वापरले जाणारे रॉकेलचे दिवे धूर आणि आगीच्या धोक्याचं कारण बनतात. पण बटाटा बॅटरी पूर्णपणे सुरक्षित आहे. यातून कोणताही विषारी वायू बाहेर पडत नाही.

पर्यावरणासाठी उत्तम
शेतीतल्या कचऱ्याचा वापर करून ऊर्जा मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. याचा पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

एक आशेचा किरण
आजही जगभरात जवळपास १२० कोटी लोक विजेविना अंधारात जगत आहेत. अशा विकसनशील देशांसाठी हे सोपं आणि नैसर्गिक तंत्रज्ञान एक वरदान ठरू शकतं. स्वयंपाकघरातली ही सामान्य भाजी जगाची ऊर्जेची गरज भागवू शकते, हा विज्ञानाचा एक चमत्कारच आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Staircase Decor : घरातल्या जिन्याला बनवा 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन', लाईट्स आणि शोपीसच्या या 7 डिझाइन्स ट्राय करा
ग्रीन स्टोन पेंडेंटच्या 'या' 6 डिझाइन्स नक्की ट्राय करा, दिसाल रॉयल