Health Insurance : कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री आहे? मग पॉलिसी घेताना 'या' चुका टाळा

Published : Oct 20, 2026, 12:58 PM IST
Health Insurance : कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री आहे? मग पॉलिसी घेताना 'या' चुका टाळा

सार

तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल, तर भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स निवडणं खूप गरजेचं आहे. किमान २५ ते ५० लाखांचे कव्हर, सब-लिमिट नसलेली आणि रिस्टोअर बेनिफिट असलेली पॉलिसीच घ्या. यात आधुनिक उपचार आणि वार्षिक तपासण्या कव्हर होणंही महत्त्वाचं आहे.

मुंबई : आई-वडिलांना किंवा कुटुंबात कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे का? सध्या तुम्हाला कोणताही त्रास नसला तरी, भविष्यातील धोके ओळखून आधीच सावधगिरी बाळगणं शहाणपणाचं ठरतं. अशा वेळी अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाला तोंड देण्यासाठी एक भक्कम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं मस्ट आहे.

कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री असेल, तर इन्शुरन्स घेताना कव्हरेजची रक्कम सर्वात महत्त्वाची असते. भारतात सध्या गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी २० ते २५ लाख रुपये सहज खर्च होतात. त्यामुळे किमान २५ ते ५० लाख रुपयांचं कव्हरेज असलेली पॉलिसी घेणं कधीही सुरक्षित. याशिवाय, हृदयविकाराच्या उपचारांसाठी कोणतीही 'सब-लिमिट' (Sub-limits) नसलेली पॉलिसीच निवडा.

पॉलिसीमध्ये 'रिस्टोअर बेनिफिट' (Restore Benefit) असणंही खूप गरजेचं आहे. एकाच वर्षात जर तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, तर हे फीचर तुमची इन्शुरन्सची रक्कम पुन्हा मूळ पदावर आणतं. तसेच, रूम रेंटवर कोणतीही मर्यादा नसलेली पॉलिसी निवडा, जेणेकरून चांगल्या रुग्णालयात उत्तम सुविधा मिळतील. सिरिंज, ग्लोव्हज यांसारख्या 'नॉन-कन्झ्युमेबल्स' (Non-consumables) वस्तूंचा खर्च कव्हर करणारी पॉलिसी घेतल्यास खिशाला नाहक कात्री लागणार नाही.

स्टेंट टाकणे किंवा रोबोटिक सर्जरी यांसारख्या आधुनिक उपचारांना कव्हर करणारी पॉलिसी नेहमी फायद्याची ठरते. सोबतच ईसीजी (ECG), लिपिड प्रोफाईल, स्ट्रेस टेस्ट यांसारख्या वार्षिक तपासण्या आणि ओपीडी (OPD) कव्हर होत असल्याची खात्री करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या शहरातील नामांकित हार्ट हॉस्पिटल्स तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या 'कॅशलेस नेटवर्क'मध्ये आहेत की नाही, हे नक्की तपासा.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Egg Yolk : अंड्यातील पिवळा बलक जास्त खाल्ल्याने खरंच हार्ट अटॅकचा धोका वाढतो का?
Heart Health Habits : तुमच्या हृदयाला गुपचूप नुकसान पोहोचवणाऱ्या 5 सवयी