Dal Cooking Tips : डाळीतील पोषण टिकवून ठेवायचंय? मग डाळ शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Published : Nov 04, 2026, 02:25 PM IST

डाळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन आणि पोषक घटक डाळीतून मिळतात. पण हे सगळे घटक शरीराला मिळण्यासाठी डाळ कशी शिजवावी आणि कशी खावी, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

PREV
13
डाळ कशी शिजवावी?

भारतीय जेवणात डाळीशिवाय ताट अपूर्णच वाटतं. तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ अशा अनेक डाळींचा आपण रोजच्या जेवणात समावेश करतो. डाळीमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आणि भरपूर प्रोटीन असतं. पण हे सगळे घटक शरीराला मिळण्यासाठी आपण डाळ कशी शिजवतो, हे खूप महत्त्वाचं आहे. डाळीतील पोषण वाया जाऊ नये म्हणून ती कशी शिजवावी? तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात ते पाहूया.

23
डाळ भिजत घालणे...

अनेक जण डाळ थेट कुकरमध्ये शिजायला लावतात. पण डाळीतील पूर्ण पोषण मिळवण्यासाठी ती शिजवण्यापूर्वी किमान २ तास भिजत ठेवणं गरजेचं आहे. डाळ भिजवल्यामुळे त्यातील फायटिक ॲसिडसारखे अँटी-न्यूट्रिएंट्स निघून जातात. यामुळे आपली पचनसंस्था डाळीतील प्रोटीन चांगल्या प्रकारे शोषून घेते. तसेच पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होत नाही.

डाळ भिजवलेले पाणी फेकून देऊ नका...

डाळ भिजवण्यापूर्वी ती ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर ती चांगल्या पाण्यात भिजत ठेवा. अनेक जण डाळ भिजवलेले पाणी फेकून देतात, पण ही चूक करू नका. डाळ पाण्यात भिजते तेव्हा त्यातील व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी त्या पाण्यात उतरतात. ते पाणी फेकून दिल्यास सगळी जीवनसत्त्वे वाया जातात. त्यामुळे डाळ शिजवताना तेच पाणी वापरा, जेणेकरून पोषण सुरक्षित राहील.

33
डाळीतील पोषण दुप्पट करण्यासाठी...

पॉलिश न केलेल्या डाळींना पसंती द्या: चकचकीत दिसणाऱ्या डाळी पाहून फसू नका. कृत्रिम पॉलिश केलेल्या डाळींपेक्षा सेंद्रिय किंवा अनपॉलिश्ड डाळींमध्ये नैसर्गिक पोषण आणि फायबर जास्त असते.

दर्जाशी तडजोड नको: जास्त प्रोटीन, कमी फॅट आणि आवश्यक पोषक घटक देणाऱ्या चांगल्या दर्जाच्या डाळींची निवड करा.

डाळी मिक्स करून शिजवा: रोज एकच डाळ खाण्याऐवजी तूरडाळ, मूगडाळ आणि उडीदडाळ एकत्र करून शिजवा. यामुळे शरीराला विविध प्रकारचे अमिनो ॲसिड आणि पोषण मिळते.

जेवणात विविधता आणा: फक्त वरण-भात खाण्यावर थांबू नका. डाळींचे सॅलड, स्नॅक्स, डाळीचे डोसे किंवा पोळीच्या पिठात डाळ मिसळून नवीन पदार्थ तयार करा. डाळीपासून तुम्ही अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता. यामुळे तुम्हाला डाळीतील सर्व पोषण मिळेल आणि तुम्ही निरोगी राहाल.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories