कुंभ राशीत दुर्मिळ योगायोग, 100 वर्षांनी महायुती, या राशींवर होणार पैशांचा वर्षाव!

Published : Feb 07, 2026, 09:50 AM IST

Aquarius Transit Sun Venus Rahu Conjunction Impact on Zodiac Signs : कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि राहू यांच्या संयोगाने एक दुर्मिळ त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे मिथुन, धनु आणि मकर राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ आणि नशिबाची साथ मिळणार आहे.

PREV
15
कुंभ राशीत ग्रहांची दुर्मिळ युती

ज्योतिषशास्त्रानुसार, सुमारे १०० वर्षांनंतर कुंभ राशीत एक दुर्मिळ आणि शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे या महिन्यात ग्रहांच्या हालचाली काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहेत. विशेषतः ६ फेब्रुवारी रोजी शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश झाला आहे. या राशीत राहू आधीपासूनच आहे. आता १३ फेब्रुवारी रोजी सूर्य देखील याच राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि राहू यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होत आहे. या दुर्मिळ योगामुळे तीन राशींना खूप फायदा होणार आहे.

25
मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल. यामुळे तुमच्या करिअरमध्ये उत्तम वाढ दिसेल. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करेल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित वाद मिटून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या सोबत असेल. विशेषतः परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरदारांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. अविवाहितांना चांगले विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल.

35
धनु राशी

धनु राशीच्या लोकांना या ग्रहांच्या युतीमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. परदेशी व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळतील. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे किंवा कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

45
मकर राशी

मकर राशीच्या लोकांचे मनोधैर्य या त्रिग्रही योगामुळे वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात प्रगती दिसेल. करिअरच्या दृष्टीने तुम्ही नवीन उंची गाठाल. मकर राशीचे लोक नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून प्रशंसा आणि बढती मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्याने मानसिक शांतता मिळेल.

55
भाग्यशाली काळ आतापासून सुरू

१३ फेब्रुवारीपासून सुरू होणारी सूर्य, शुक्र आणि राहू यांची युती ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. शंभर वर्षांनंतर आलेली ही एक दुर्मिळ संधी असल्याने, वर नमूद केलेल्या तीन राशीच्या लोकांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

Read more Photos on

Recommended Stories