वयाची ४० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्हाला तरुण आणि फ्रेश दिसायचंय का? यासाठी कोणत्याही महागड्या उपचारांची गरज नाही. रोजच्या जगण्यात फक्त या ६ सोप्या सवयी लावून घ्या. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसाल.
वयाची ४० वर्षे ओलांडली म्हणजे चेहऱ्यावर म्हातारपण दिसायलाच हवं, असं अजिबात नाही. वाढतं वय आपण थांबवू शकत नाही हे खरंय. पण त्वचेची काळजी, व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य आहार याकडे लक्ष दिल्यास तुम्ही नक्कीच फ्रेश आणि तरुण दिसू शकता. यासाठी रोजच्या आयुष्यात काही सोप्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे.
28
रोज व्यायामासाठी वेळ काढा
चाळिशीनंतर शरीराची हालचाल आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही रोज चालणे, सायकलिंग, योगासने यासारखे व्यायाम करू शकता. यासोबतच आठवड्यातून काही दिवस स्नायूंना बळकट करणारे व्यायामही करा. व्यायामामुळे शरीर सक्रिय राहतं आणि रोजच्या कामांमध्ये तुम्हाला फ्रेश वाटतं.
38
आहारात प्रोटीन आणि भाज्यांवर भर द्या
वय वाढतं तसं शरीराला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळणं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार अंडी, डाळी, कडधान्ये, मासे आणि दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
तसंच वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या, फळे आणि तृणधान्ये खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारे अनेक जीवनसत्त्वे मिळतात.
चेहऱ्यावर म्हातारपण दिसण्यामागे सूर्यप्रकाशाचा मोठा वाटा असतो. तुम्हाला जास्त वेळ उन्हात राहावं लागत असेल, तर चांगल्या SPF असलेलं सनस्क्रीन नक्की वापरा.
बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. त्वचेची अशी नियमित काळजी घेतल्यास ती दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते.
58
झोपेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
"झोप पूर्ण झाली नाही की चेहरा थकलेला दिसतो", असा अनुभव अनेकांना येतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.
रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावून घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
68
धूम्रपान आणि अति मद्यपान टाळा
धूम्रपानामुळे आरोग्याचं तर नुकसान होतंच, पण त्याचा त्वचेवरही खूप वाईट परिणाम होतो. तसंच जास्त मद्यपान केल्याने शरीराच्या एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
या सवयी टाळल्यास तुमचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहील आणि चेहऱ्यावरही एक वेगळाच तजेला राहील.
78
ताणतणावावर नियंत्रण ठेवा
सततच्या ताणतणावामुळे तुमची झोप, खाण्याच्या सवयी आणि रोजची जीवनशैली बिघडू शकते. यामुळे शरीर आणि चेहरा दोन्ही थकल्यासारखे दिसू लागतात.
रोज थोडा वेळ चालणे, ध्यान करणे, योगासने, गाणी ऐकणे किंवा तुमच्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढल्यास मन शांत होण्यास मदत मिळते.
88
चाळिशी म्हणजे शेवट नाही!
तरुण दिसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर वय न दिसणं असं नाही. तर सक्रिय राहणं, शांत झोप घेणं, सकस आहार घेणं, व्यायाम करणं आणि मन आनंदी ठेवणं या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
वय लपवण्यापेक्षा वयानुसार योग्य आणि निरोगी जीवनशैली अंगीकारली, तर तुम्ही दीर्घकाळ फ्रेश आणि निरोगी राहाल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.