प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. स्नायू बळकट करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पोट भरलेलं ठेवण्यासाठी प्रोटीन आपल्याला मदत करतं.
तुम्हाला सतत गोड किंवा कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या आहारात प्रोटीनची कमतरता आहे. प्रोटीन आपली भूक नियंत्रित करतं आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवतं.
28
पायांना त्रास
शरीरात प्रोटीनची तीव्र कमतरता निर्माण झाल्यास पायांना आणि घोट्याला सूज येते. हा त्रास सतत जाणवत असेल, तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
38
प्रोटीनयुक्त आहार महत्त्वाचा
शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं. तुम्हाला वारंवार सर्दी किंवा इन्फेक्शन होत असेल, तर लगेच प्रोटीनयुक्त आहार घेण्यास सुरुवात करा.
जखम भरून येण्यासाठी जास्त वेळ लागणे हे प्रोटीनच्या कमतरतेचं आणखी एक लक्षण आहे. तुमच्या शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होत नसतील, तर शरीराला रिकव्हर होण्यासाठी जास्त प्रोटीनची गरज आहे.
58
केस, नखं लवकर तुटणं
जेवण करूनही तुम्हाला सतत भूक लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून पोट भरल्याची जाणीव देतं. तसेच केस आणि नखे लवकर तुटणे हे देखील प्रोटीनच्या कमतरतेचं लक्षण आहे.
68
प्रोटीनच्या कमतरतेचं पहिलं मोठं लक्षण
केस आणि नखे लवकर तुटणे हे प्रोटीनच्या कमतरतेचं पहिलं लक्षण मानलं जातं. आपले केस आणि नखे प्रोटीनपासूनच बनलेले असतात. त्यामुळे केस जास्त गळत असतील, तर शरीराला पुरेसं प्रोटीन मिळत नाहीये हे समजून घ्या.
78
स्नायूंची वाढ
आपल्या शरीरासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. स्नायूंची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी याची गरज असते. रोजच्या आहारात पुरेसं प्रोटीन न मिळाल्यास शरीर काही स्पष्ट लक्षणं दाखवायला सुरुवात करतं.
88
सतत थकवा असणं
तुम्हाला सतत थकवा किंवा ऊर्जेची कमतरता जाणवत असेल, तर त्यामागे प्रोटीनची कमतरता असू शकते. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं.