
अनेकजण घर सजवताना घराच्या आतमध्ये विविध प्रकारची झाडे लावतात. त्यात घराला बाल्कनी असेल तर, सोन्याहून पिवळे! त्यामुळे विविध प्रकारची झाडे आणि वेलींनी बाल्कनी सजवली जाते. काही झाडे शोभेची तर काही झाडे वेगवेगळ्या सुंदर अशा फुलांची… असे कॉम्बिनेशन केले जाते. त्यामुळे घराचे सुशोभीकरण खूपच छान होते. मात्र, याची देखभालही तेवढीच करावी लागते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तरीही काही झाडे सुकतातच! मग अशावेळी काय करायचे?
घरात झाडे लावण्याचा छंद प्रत्येकाला असतो. एकतर ती प्रदूषणाने भरलेल्या शहरात ताजेपणा देतात आणि सुंदरही दिसतात. तुम्हीही अनेकदा बाल्कनी किंवा टेरेसवर झाडे लावत असाल आणि ती वारंवार सुकत असतील, तर मेहनत वाया घालवण्याऐवजी काहीतरी असं करून बघा, जे सोपे असेल आणि बाल्कनी आणखी सुंदर दिसेल. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच 8 वेली घेऊन आलो आहोत, ज्या कमी पाण्यातही चांगल्या प्रकारे पसरतात आणि रंगीबेरंगी फुलेही देतात.
बाल्कनीमध्ये चांगला सूर्यप्रकाश येत असेल तर बोगनवेलिया वेल लावा. ही वेल उन्हात चांगली वाढते. तिला जास्त पाण्याची गरज नसते. विशेष म्हणजे, या वेलीला गुलाबी, नारंगी, पांढरी, जांभळी आणि पिवळ्या रंगाची फुले येतात. तुम्हालाही हिवाळ्यात काहीतरी वेगळे हवे असेल तर, याची निवड करा. नर्सरी आणि ऑनलाइन ही वेल 150-250 रुपयांपर्यंत मिळेल.
ही वेल तिच्या अनोख्या फुलांसाठी ओळखली जाते. तिला रंगून क्रीपर असेही म्हणतात. तिचे वैशिष्ट्य म्हणजे, या वेलीला आधी पांढरी फुले येतात, जी हळूहळू गुलाबी आणि नंतर लाल होतात. तुम्ही वेगाने वाढणाऱ्या रोपाच्या शोधात असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. तिचा सुगंधी दरवळ मन प्रसन्न करेल. तुम्ही ही वेल 300 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
ही वेल हिवाळ्यात लावल्यास उन्हाळ्यापर्यंत भरपूर फुले मिळतील. हे खूप वेगाने वाढणारे रोप आहे, तुम्ही ते कुंडीत लावून भिंतीवर पसरवू शकता. मोठी निळी-जांभळी फुले तिचे सौंदर्य आणखी वाढवतात. नर्सरीमध्ये बियाणे किंवा रोपाच्या स्वरूपानुसार ही 350-400 रुपयांपर्यंत मिळेल.
भारतात हे रोप कृष्णकमळ या नावाने ओळखले जाते, जे त्याच्या अनोख्या डिझाइनच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर, याच्या काही प्रकारांना फळेही येतात. हे रोप Home Decor साठी उत्तम आहे.
ही वेल 'कुंद' या नावानेही ओळखली जाते. तुम्हाला असे रोप हवे असेल जे 12 महिने हिरवेगार राहील, तर याची निवड करा. पांढरी सुगंधी फुले देणारे हे रोप संध्याकाळी छान सुगंध देते, जे तुमचे मन आणि मूड दोन्ही ताजेतवाने ठेवेल. तुम्ही हे Amazon-Flipkart किंवा ऑनलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.
शेजाऱ्यांना प्रभावित करायचे असेल तर, बाल्कनीमध्ये ब्लिडिंग हार्ट वाइन लावा. या वेलीला पांढरी-लाल फुले येतात, जी हृदयाच्या आकाराची (हार्ट शेप) असतात. हे दिसायला खूप सुंदर दिसते. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर, ही वेल बाल्कनीत नक्की लावा. ऑनलाइन गार्डनिंग स्टोअर्समधून याची बियाणे आणि रोप सहज खरेदी करता येते.
संक्रांत वेल या नावाने ओळखले जाणारे हे रोप वेगाने वाढते. यामध्ये 30-45 दिवसांत नारंगी रंगाची फुले येऊ लागतात. बाल्कनीला जिवंत आणि व्हायब्रंट बनवायचे असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.