
non-Hindus banned in this temples: आपल्या देशात लाखो मंदिरं आहेत आणि या सर्व मंदिरांशी काही ना काही मान्यता आणि परंपरा जोडलेल्या आहेत. यातील काही मंदिरं अशीही आहेत जिथे गैर-हिंदूंना जाण्यास सक्त मनाई आहे. गैर-हिंदू म्हणजे जे लोक हिंदू नसून अन्य कोणत्याही धर्माचे आहेत. या नियमाबाबत इथे खूपच कडकपणा पाळला जातो. जर कोणावरही शंका असेल तर त्याला लगेच चौकशी करून त्याचे हिंदू असल्यावरच मंदिरात प्रवेश दिला जातो. पुढे जाणून घ्या अशाच ५ मंदिरांबद्दल…
ओडिशातील पुरी येथे असलेले भगवान जगन्नाथचे मंदिर हिंदूंच्या पवित्र चार धामांपैकी एक आहे. इथे दरवर्षी काढली जाणारी रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. या मंदिरात कोणत्याही गैर-हिंदूच्या येण्यास सक्त मनाई आहे. हा नियम इतका कडक आहे की १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनाही जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता कारण त्यांनी फिरोज गांधींशी लग्न केले होते जे पारशी धर्माचे होते.
केरळच्या त्रिशूरमध्ये भगवान गुरुवायुर मंदिराचे प्रसिद्ध मंदिर आहे. मान्यता आहे की हे मंदिर सुमारे ५ हजार वर्षे जुने आहे. मंदिरात भगवान गुरुवायुरप्पनची पूजा केली जाते जे भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपात आहेत. हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचे घर मानले जाते. याला दक्षिणचे बैकुंठ आणि द्वारकेची उपाधी दिली आहे. या मंदिरातही फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो.
तामिळनाडूच्या कांचीपुरममध्ये कामाक्षी अम्मन मंदिर आहे, जे देवी पार्वतीला समर्पित आहे. कांची हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ७ शहरांपैकी एक आहे. या मंदिरात देवी पार्वतीची कामाक्षी नावाने पूजा केली जाते. स्वयं आदिगुरु शंकराचार्यही इथे आले होते. इथेही गैर-हिंदूंचे येणे सक्त मना आहे.
चेन्नईच्या मलयापूरमध्ये कपालेश्वर मंदिर आहे, जे ७ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. इथे दर्शनासाठी नियम खूप कडक आहेत. हिंदूंव्यतिरिक्त इथे कोणत्याही अन्य धर्माच्या व्यक्तीचा प्रवेश निषिद्ध आहे. इतकेच नाही तर विदेशी पर्यटकही इथे मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत.
उत्तर प्रदेशातील काशीमध्ये गंगा तटाजवळ भगवान विश्वनाथचे मंदिर आहे जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथे रोज लाखो लोक दर्शन करण्यासाठी येतात. काशी हे हिंदूंच्या सर्वात पवित्र ७ शहरांपैकी म्हणजेच सप्तपुरींपैकी एक आहे. भगवान विश्वनाथच्या मंदिरात फक्त हिंदूच जाऊ शकतात. मंदिराच्या आत उत्तरेकडे एक पवित्र विहीर आहे, इथेही फक्त हिंदूच येऊ शकतात.
Disclaimer
या लेखात जी माहिती आहे, ती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांकडून घेतली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुम्हाला पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वापरकर्ते या माहितीला फक्त माहिती म्हणूनच समजावे.