Living Wifes Last Rites : अजबच! नवऱ्याने घातलं जिवंत बायकोचं श्राद्ध, व्हॉट्सॲपवर ठेवला पिंडदानाचा व्हिडिओ

Published : Aug 04, 2026, 09:53 PM IST
Living Wifes Last Rites : अजबच! नवऱ्याने घातलं जिवंत बायकोचं श्राद्ध, व्हॉट्सॲपवर ठेवला पिंडदानाचा व्हिडिओ

सार

Man Performs Living Wifes Last Rites : एका नवऱ्याने चक्क आपल्या जिवंत बायकोचे अंत्यसंस्कार केले. इतकंच नाही, तर त्याने पिंडदानाचा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला. यानंतर घाबरलेल्या पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून एक भलतीच विचित्र बातमी समोर आली आहे. एका नवऱ्याने आपल्या जिवंत पत्नीचं 'पिंडदान' केलंय, म्हणजेच तिचे अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेमुळे तो सध्या चर्चेत आला आहे. आणि यामागचं कारण तर त्याहूनही विचित्र आहे.

पत्नीचं 'पिंडदान'

ही घटना फिरोजाबादच्या लाइनपार पोलीस स्टेशन परिसरात घडली. या व्यक्तीने पत्नीचे अंत्यसंस्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २ ऑगस्ट रोजी जितेंद्र प्रकाश नावाच्या या व्यक्तीने पत्नीचं पिंडदान केलं आणि त्याचा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केला. 

आता त्याची पत्नी दीपा स्वर्णकार हिने पती जितेंद्र प्रकाश आणि सासूवर छळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संरक्षणाची मागणी केली असून एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

१० वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

नागला विष्णूची रहिवासी असलेल्या दीपा स्वर्णकार हिचं लग्न २६ ऑगस्ट २०१४ रोजी जितेंद्र प्रकाशसोबत झालं होतं. दीपाचा आरोप आहे की, लग्नापासूनच तिचा पती जितेंद्र, सासू मंजू वर्मा, नणंद शालिनी आणि दीर नकुल हे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. ३० जुलै रोजी तिच्यावर हल्ला झाला होता आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिला एका खोलीत कोंडून घ्यावं लागलं होतं, असंही दीपाने सांगितलं.

दीपाच्या म्हणण्यानुसार, तिच्या नवऱ्याने २ ऑगस्ट रोजी तिचं पिंडदान केलं. जेव्हा तिने याबद्दल त्याला जाब विचारला, तेव्हा तो फक्त इतकंच म्हणाला, "तू माझ्यासाठी मेली आहेस." त्याला आता तिच्यासोबत राहायचं नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. आपल्याकडे पतीच्या जीवे मारण्याच्या धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावाही दीपाने केला आहे.

या जोडप्याला दोन मुलं आहेत आणि आपल्यासोबत त्यांचाही मानसिक छळ होत असल्याचा आरोप दीपाने केला आहे. तिने पोलिसांना आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि आपल्याला संरक्षण द्यावं, अशी विनंती केली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

CJP Protest : दिल्लीत आज 'जंतर मंतर 2.0' आंदोलन, अनेक आंदोलक ताब्यात
Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest