बीड जिल्ह्यातील परळी शहरात हवेचे प्रदूषण वाढले असून सॅटेलाइट आधारित आकडेवारीनुसार AQI ११० च्या पुढे नोंदवला जात आहे. औद्योगिक प्रदूषण, सिमेंट कारखाने, धूळ, झाडांची कमतरता आणि कोरड्या हवामानामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीतील फटाक्यांमुळे प्रदूषण आणखी वाढण्याची भीती आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसन व हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क वापरणे आणि अनावश्यक फटाके टाळणे गरजेचे असून प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.