
तळेगाव येथील १९७४ मध्ये सुरू झालेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह संस्था अनेक वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संस्थेची पाहणी करत १५ तारखेला भूमिपूजन होणार असल्याची माहिती दिली. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून ही संस्था पुनरुज्जीवित होत असून बँकांचे कर्ज आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे साखर कारखाने आणि दुग्धव्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे उत्पादन होणार असून भविष्यात निर्यातीचीही संधी निर्माण होईल. यामुळे मावळ आणि पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मोहोळ यांनी सांगितले.