
मुंबई महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर SRA प्रकल्प राबवण्याच्या मुद्द्यावरून अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी असलेल्या SRA योजनेच्या नावाखाली महापालिकेच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भात पत्र लिहिल्याचाही उल्लेख केला. तसेच एअर इंडियाची इमारत खरेदी आणि तिच्या डागडुजीवरील कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांना ₹५००० मदत आणि कर्जमुक्ती वेळेवर मिळत नसताना सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याची टीका दानवेंनी केली.