
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे सांगितले. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून धमक्यांची जबाबदारी कसा घेतो, याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹5000 मदतीसह थकीत ₹4000 आणि हेक्टरी ₹1 लाख मदत देण्याची मागणी केली. बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये आणि रोजगार हमीची कामे सुरू करावीत, असेही त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी यांचे पुत्र रेयान वाड्रा यांच्या प्रदर्शनातील छायाचित्रे हटवल्याचा निषेध त्यांनी केला. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत प्रदीप पूर्णेकर प्रकरणाच्या तपासाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई, बेरोजगारी आणि देशातील राजकीय वातावरणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.