Biometric Voting : बोगस मतदानाला लागणार चाप? पोलिंग बूथवर आता फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग?

Published : Apr 14, 2026, 08:11 AM IST
Supreme Court To Hear Plea On Biometric Verification At Polling Booths

सार

Supreme Court To Hear Plea On Biometric Verification At Polling Booths : बोगस मतदान रोखण्यासाठी मतदान केंद्रांवर फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे बायोमेट्रिक स्कॅनिंग सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. 

Supreme Court To Hear Plea On Biometric Verification At Polling Booths : बोगस मतदान रोखण्यासाठी मतदान केंद्रांवर फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्या, अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. कोर्टाने सोमवारी ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. या प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि इतर काही राज्यांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की, 'याचिकेत केलेली मागणी सध्या काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी लागू करता येणार नाही. पण भविष्यात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांसाठी याचा विचार व्हायला हवा.'

वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी हा अर्ज सुप्रीम कोर्टात केला आहे. त्यांच्या मते, 'लाचखोरी, अवाजवी दबाव आणि बोगस मतदान यांसारख्या गोष्टींमुळे निवडणूक प्रक्रियेची शुद्धता आणि प्रामाणिकपणा धोक्यात येतो. याचा नागरिकांवर खूप मोठा आणि वाईट परिणाम होतो. त्यामुळे मतदान केंद्रांवर फिंगरप्रिंट आणि डोळ्यांची बायोमेट्रिक तपासणी सुरू करावी आणि निवडणूक आयोगाला तसे निर्देश द्यावेत,' अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc