दिल्ली-NCR मध्ये दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्यास SC ची परवानगी, वेळा केल्या निश्चित!

Published : Oct 15, 2025, 10:57 AM ISTUpdated : Oct 15, 2025, 12:00 PM IST
Supreme Court Permits Green Crackers

सार

Supreme Court Permits Green Crackers : दिवाळीपूर्वी एक मोठा निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-NCR मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी दिली. 

Supreme Court Permits Green Crackers : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत 18 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) मध्ये ग्रीन फटाक्यांची विक्री आणि वापर करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे फटाक्यांवरील पूर्वीची बंदी शिथिल करण्यात आली आहे.

कोर्टाच्या निर्णयामागील प्रमुख कारणे

सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि इतरांनी केलेल्या सूचनांचा विचार करून हा आदेश दिला. कोर्टाने आपला दृष्टिकोन स्पष्ट करताना पुढील निरीक्षणे नोंदवली:

संतुलित दृष्टिकोन आवश्यक: फटाका उद्योगाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहेत आणि बंदीमुळे पारंपारिक फटाक्यांची तस्करी वाढून पर्यावरणाचे अधिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतुलित दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.

हवेच्या गुणवत्तेवर कमी परिणाम: फटाक्यांवर बंदी असतानाही, कोविड-19 काळात वगळता हवेच्या गुणवत्तेत (Air Quality) फारसा फरक आढळला नाही.

ग्रीन फटाक्यांची कार्यक्षमता: 'अर्जुन गोपाळ' प्रकरणात दिलेल्या निर्णयानंतर ग्रीन फटाक्यांची संकल्पना सुरू झाली. सहा वर्षांमध्ये ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, यात NEERI (नॅशनल एनव्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) चे मोठे योगदान आहे.

फटाके फोडण्यासाठी वेळ आणि ठिकाणाची अट

फटाक्यांवरील बंदी शिथिल करताना कोर्टाने 'ग्रीन फटाक्यांच्या' वापरासाठी वेळेची आणि ठिकाणाची अट कायम ठेवली आहे:

वेळेची मर्यादा: सकाळ 6 ते सकाळी 7 आणि रात्री 8 ते रात्री 10 या निर्धारित वेळेतच ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी असेल.

फोडण्याचे ठिकाण: ग्रीन फटाके केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या जागेवरच फोडता येतील.

सॉलिसिटर जनरल यांची मागणी

यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी कोर्टाने बंदी पूर्णपणे व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी "आमच्या मुलांना किमान दोन दिवस तरी उत्साहाने दिवाळी साजरी करू द्या" अशी विनंती केली होती. तसेच, त्यांनी दिवाळीसाठी फटाके फोडण्याच्या वेळेत शिथिलता आणण्याची आणि ख्रिसमस (Christmas), न्यू इअर ईव्ह (New Year Eve) आणि गुरुपूरबसाठी (Gurpurab) देखील विशिष्ट वेळेची मागणी केली होती.

न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रीन फटाक्यांची विक्री करण्यास मनाई केली होती, मात्र त्यांच्या उत्पादनास परवानगी दिली होती. आता विक्री आणि वापरावरील बंदी 21 ऑक्टोबरपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!