एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड, हाँगकाँगहून दिल्लीला निघालेल्या फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग

Published : Jun 16, 2025, 12:48 PM ISTUpdated : Jun 16, 2025, 02:12 PM IST
Representative Image (Photo: X/ @airindia)

सार

हज यात्रेकरूंसह सुमारे २५० प्रवासी घेऊन जाणारे सौदी अरेबियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे लखनौमध्ये आणीबाणीने उतरले.

नवी दिल्ली/हाँगकाँग - अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची घटना ताजी असतानाच, आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाँगकाँगहून दिल्लीकडे निघालेल्या AI315 या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे विमानाला परत हाँगकाँगमध्ये उतरवावे लागले.

बोईंग 787-8 ड्रीमलाइनर प्रकारातील हे विमान एअर इंडियाचे असून, नियमित उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रणेमध्ये अडचणी निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विमानाने दिल्लीच्या दिशेने सुरू केलेले उड्डाण अर्धवट सोडून माघारी परत येऊन हाँगकाँग विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली.

सर्व प्रवासी सुखरूप, तपास सुरू विमानात किती प्रवासी होते याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी, सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांच्यावर कोणतीही गंभीर इजा झालेली नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी ANI या वृत्तसंस्थेला दिली आहे.

या घटनेनंतर तांत्रिक टीमने विमानाची सखोल तपासणी सुरू केली आहे. नेमका बिघाड कोणत्या भागात झाला हे शोधण्यासाठी एअर इंडियाच्या अभियांत्रिकी विभागाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रक्रियेस काही तास लागू शकतात, असेही सुत्रांचे म्हणणे आहे.

वारंवारच्या घटना आणि बोईंग विमाने पुन्हा चर्चेत 

सदर घटना ही एअर इंडियासाठी दुसऱ्या दिवशी घडलेली तांत्रिक अडचण असल्याने विशेष चर्चेचा विषय बनली आहे. याआधी, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला होता, ज्यामध्ये डोंबिवलीतील केबिन क्रू मेंबर रोशनी सोनघरे यांचा मृत्यू झाला होता.

या घटना एअर इंडियाच्या बोईंग विमानांवरील विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. यामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुनर्विचाराची गरज निर्माण झाली आहे, अशी चर्चा विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आहे.

Saudi Plane : लखनौमध्ये तांत्रिक बिघाडानंतर सौदीच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग

लखनौ- हज यात्रेकरूंसह सुमारे २५० प्रवासी घेऊन जाणारे सौदी अरेबियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे लखनौमध्ये आणीबाणीने उतरवण्यात आले. सौदी अरेबिया एअरलाइन्सचे विमान लखनौ विमानतळावर उतरताना चाकातून ठिणग्या आणि धूर निघताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, हायड्रॉलिक सिस्टीममधील गळतीमुळे चाकात बिघाड झाल्याची शक्यता आहे.

 

Flightradar24 च्या माहितीनुसार, एअरबस A330-343 हे विमान रात्री 10:45 वाजता जेद्दाहहून निघाले आणि सकाळी 6:50 वाजता लखनौला पोहोचले.

हैदराबादला जाणारे लुफ्थांसाचे विमान फ्रँकफर्ट विमानतळावर परतले

दुसऱ्या एका घटनेत, हैदराबादला जाणारे लुफ्थांसाचे विमान बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर परत फ्रँकफर्ट विमानतळावर परतले कारण विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फ्लाइट LH752 जर्मनीहून निघाले होते. सोमवारी पहाटे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. तथापि, लुफ्थांसा एअरलाइन्सने सांगितले की त्यांना 'उतरण्याची परवानगी मिळाली नाही', तर हैदराबाद विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती.

लुफ्थांसा एअरलाइन्सने ANI ला सांगितले, “आम्हाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी मिळाली नाही, म्हणूनच विमानाने यू-टर्न घेतला आणि परतले.”

त्याचप्रमाणे, 13 जून रोजी, दिल्लीला जाणारे थायलंडच्या फुकेटहून येणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बच्या धमकीमुळे आणीबाणीने उतरले, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एअर इंडियाचे विमान AI 379 फुकेटहून 9.30 वाजता निघाले होते आणि ते नवी दिल्लीला जात होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!