
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या क्लिपमध्ये सहभागी असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या चार व्यक्तींची चौकशी व्हावी, तसेच क्लिप खरी की खोटी हे फॉरेन्सिक तपासातून स्पष्ट व्हावे, असे त्यांनी सांगितले. नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले असेल तर ते उघड झाले पाहिजे, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तपासाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. ईडी चौकशीच्या मागणीवरून त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाचही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीतील मतभेदांमुळे त्यांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा करत सत्ताबदलाची सध्या शक्यता नसल्याचेही त्यांनी म्हटले.