Tukaram Munde | तुकाराम मुंढे तुमच्या मागे 2 ते 5 लाखांची सेटिंग्ज करणारे आवरा - संजय राऊत

Tukaram Munde | तुकाराम मुंढे तुमच्या मागे 2 ते 5 लाखांची सेटिंग्ज करणारे आवरा - संजय राऊत

Published : Sep 28, 2026, 07:05 PM IST

संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्या FDAमधील कामाचे कौतुक करतानाच त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हॉटेलमधील स्वच्छता, भेसळयुक्त दूध आणि पनीरवरील कारवाईचा जनतेला फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, पूर्वी ₹8-12 हजार असलेले कथित दर आता ₹75 हजार ते ₹2 लाखांपर्यंत गेल्याचा दावा करत आपल्याकडे पुरावे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याचे राऊत म्हणाले. परवाना रद्द करण्याची धमकी देऊन व्यावसायिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.