Manoj Jarange Patil | Sanjay Raut | जरांगेंच्या आरोपावर संजय राऊतांची शिंदेंच्या चौकशीची मागणी

Manoj Jarange Patil | Sanjay Raut | जरांगेंच्या आरोपावर संजय राऊतांची शिंदेंच्या चौकशीची मागणी

Published : Oct 21, 2026, 03:02 PM IST

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांवरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला लक्ष्य केले. जरांगेंचा आवाज दाबण्यासाठी भाजप नेत्याकडून 500 कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपानंतर झालेल्या कारवाईचा दाखला देत शिंदेंना ED ची नोटीस का नाही, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने FIR दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा आणि ED मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. जरांगेंकडे असलेली माहिती आपल्याकडेही असल्याचा दावा राऊतांनी केला.