Rahul Gandhi : राहुल गांधींचा आरोप, 'बेला इस्टेटमधील 728 पैकी फक्त एकाचे मत शिल्लक, बाकी सर्वांची नावे गायब'

Published : Sep 28, 2026, 09:59 PM IST
Rahul Gandhi : राहुल गांधींचा आरोप, 'बेला इस्टेटमधील 728 पैकी फक्त एकाचे मत शिल्लक, बाकी सर्वांची नावे गायब'

सार

२०२४ आणि २०२५ च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सामान्य मजुरांची नावे SIR च्या नावाखाली मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

नवी दिल्ली : मतदार यादीतील घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत यमुना नदीच्या काठावर असलेल्या बेला इस्टेटमध्ये राहणाऱ्या ७२८ लोकांपैकी तब्बल ७२७ जणांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली आहेत. फक्त एकाच व्यक्तीचे नाव यादीत शिल्लक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२०२४ आणि २०२५ च्या निवडणुकांमध्ये ज्या सामान्य मजुरांनी मतदान केले होते, त्यांचीच नावे 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेच्या नावाखाली वगळण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी स्वतः या वस्तीला भेट दिली आणि तिथूनच थेट एसडीएम (SDM) अधिकाऱ्याशी फोनवर संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओ त्यांनी 'एक्स' (X) वर शेअर केला आहे.

"हे एसआयआर (SIR) नसून थेट मतांची चोरी आहे," अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली. तसेच, ज्यांनी ही एसआयआर प्रणाली तयार केली, त्यांनी यावर उत्तर द्यायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ओवैसी: 5 वर्षांपासून अल्पसंख्याक शिष्यवृत्ती नाही
Student March | आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येणार | tribal student