पहलगामच्या १६ वर्षीय रुबीनाचे अदम्य साहस, जिव धोक्यात टाकून पर्यटकांना मदत

Vijay Lad   | ANI
Published : Apr 26, 2025, 09:48 PM IST
पहलगामच्या १६ वर्षीय रुबीनाचे अदम्य साहस, जिव धोक्यात टाकून पर्यटकांना मदत

सार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, काश्मीरची रॅबीट गर्ल  अशी ओळख असलेल्या रुबीनाने संकटात मदत करून साहसाचे एक वेगळे उदाहरण घालून दिले आहे.  

पहलगामजवळील बैसरनच्या शांत मैदानावर गोळीबार झाल्यावर, शेकडो पर्यटक भीतीने सैरावैरा पळाले. पण १६ वर्षीय रुबीना पर्यटकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली. तिचे अतुलनिय धाडस काश्मीरच्या अदम्य साहसाचे प्रतीक बनले आहे.

मंगळवारी दुपारी, शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन इको पार्कवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले.

या घटनेतील साहसी रुबीनाची कहाणी आता प्रकाशझोतात आली आहे. आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करणारी रुबीना जेव्हा गोळीबार सुरु झाला तेव्हा चेन्नईच्या एका जोडप्यासोबत होती. यावेळी काय घडले हे सांगिताना ती म्हणाली, की सुरुवातीला आम्हाला वाटले की ते फटाके आहेत. मग ओरड, धावपळ सुरू झाली. प्रत्येकजण पळून जाण्यासाठी धडपडत होता.

 

 

सुरक्षित स्थळी पोहोचल्यानंतर, रुबीनाने स्वतःचा विचार केला नाही. तिने धाडस दाखवत चेन्नईच्या जोडप्याला मदत केली. त्यासाठी ती वारंवार पार्कच्या गेटवर गेली. यावेळी तिच्या जिवाला धोका होता. तरीही न घाबरता ती आपले काम करत राहिली.

घरी परतल्यानंतर, रुबीना आणि तिची बहीण मुमताज यांनी घाबरलेल्या पर्यटकांना पाणी आणि निवारा दिला. त्यांना आधार दिला. मुमताजने एका लहान मुलाला आपल्या कडेवर घेऊन सुरक्षित स्थळी नेले.

त्यांचे वडील, गुलाम अहमद अवान, ही घटना असहाय्यपणे पाहत होते. आजारी असल्याने ते त्यांच्या मुलींच्या कमाईवर अवलंबून आहेत. “ते प्रलयासारखे होते,” ते म्हणाले. त्यांचा आवाज खोल जात होता. “आम्ही देवाचे आभार मानतो की त्या जिवंत परतल्या.”

हल्ल्यानंतर, काश्मीर दुःखात बुडाले आहे. शांत मोर्चे, निदर्शने आणि संपूर्ण काश्मिर जणू बंद झाले आहे. घटना घडली तेव्हा पहलगाममधील हॉटेल्स, दुकानदार आणि टट्टूवाले सर्वजण पीडितांच्या कुटुंबियांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले.

अनेकांसाठी रुबीना काश्मीरच्या युवा पिढीचे प्रतीक झाली आहे. “अपरिचित लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापूर्वी तिने एकदाही विचार केला नाही,” एका स्थानिक गाईडने सांगितले. “ती काश्मीरचे खरे हृदय आहे — दयाळू, निर्भय, अढळ.”

आज, रुबीना तिच्या लाकडी खाटेवर बसली आहे. तिचे जग कायमचे बदलले आहे. ज्या पर्यटकांचे ती एकेकाळी हसत स्वागत करायची त्यांची संख्या फार कमी झाली आहे. पण तिचा आत्मा, तिच्या आजूबाजूच्या बर्फाच्छादित पर्वतांसारखा टिकून आहे.

मला फक्त शांतता हवी आहे. मला लोक या पर्वतांवर परत यावे असे वाटते. मला त्यांनी हसावे असे वाटते, भीती वाटू नये, असे ती सांगते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department