दिवाळीनिमित्त प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांच्या आईची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सध्या चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. या भेटीची माहिती एकनाथ शिंदेंना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीएतील सरकार सुरळीत सुरू असून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच धाराशिवमधील आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याबद्दल दुःख व्यक्त करत अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.