Norway Chess Tournament 2024 : दोन जगजेत्यांचा पराभव करत प्रज्ञानंदची यशस्वी कामगिरी

आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर प्रज्ञानंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक क्रमवारीत अव्वल-10 मध्ये सामील होईल. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने यापूर्वी तिसऱ्या फेरीत कार्लसनचा पराभव केला होता.

 

Ankita Kothare | Published : Jun 2, 2024 5:14 AM IST

भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बुद्धिबळाच्या पाचव्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबियानो कारुआनाचा पराभव केला आहे. या विजयासह प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि द्वितीय क्रमांकाचा खेळाडू कारुआना यांचा क्लासिक बुद्धिबळात प्रथमच पराभव केला आहे.त्यामुळे आता प्रज्ञानंदचा जागतिक क्रमवारीतील स्थान वाढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर प्रज्ञानंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक क्रमवारीत अव्वल-10 मध्ये सामील झाला आहे. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने यापूर्वी तिसऱ्या फेरीत कार्लसनचा पराभव केला होता. फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतील गतविजेता प्रज्ञानंदने चमकदार खेळी करत कार्लसनचा पराभव केला होता. याआधीही आपल्या कारकिर्दीत काही प्रसंगी प्रज्ञानंदने वेगवान आणि ब्लिट्झ गेममध्ये कार्लसनचा पराभव केला आहे.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . तसेच प्रज्ञानंदकडे पाहून नागरिक म्हणत आहेत की देशाचे भवितव्य योग्य हातात असून बुद्धिबळ खेळात भारत लवकरच अव्वल स्थान मिळवेल. 

मॅग्नस कार्लसन आणि आर प्रग्नानंद यांच्यात झाला होता सामना :

भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद 9 पैकी 5.5 गुण मिळवले आणि नॉर्वे टूर्नामेंट 2024 च्या तिसऱ्या फेरीच्या शेवटी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला आर प्रज्ञानंदला वर्ल्ड कपमध्ये मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला होता. पण आता त्याने त्या पराभवाचा बदला घेतला आणि मॅग्नस कार्लसनला क्लासिक बुद्धिबळात पराभूत करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.

आणखी वाचा :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराआधी अरविंद केजरीवाल तुरुंगात, केजरीवाल आज कुठे कुठे जाणार?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडींगचा व्हिडीओ झाला व्हायरल, Watch Video

Share this article