Waves मध्ये PM मोदींची मोठी घोषणा, ५ चित्रपट निर्मात्यांच्या नावे काढली पोस्टाची तिकीटे

Published : May 01, 2025, 02:45 PM ISTUpdated : May 01, 2025, 05:18 PM IST
modi fadnavis

सार

WAVES समिट २०२५: मुंबईत WAVES समिट २०२५ सुरू झाली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले.

WAVES समिट २०२५: वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES Summit) १ मेपासून मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झाले आहे. हे समिट ४ मेपर्यंत चालणार असून याचा उद्देश्य मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची क्षमता वाढवणे हा आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने वेव्स समिट २०२५ मध्ये सर्वांचे उस्फूर्त स्वागत केले. तो म्हणाला, "आमचे प्रमुख अतिथी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष स्वागत आहे."

 

 

५ चित्रपट निर्मात्यांच्या सन्मानार्थ पोस्टाची तिकिटे काढली

या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या समिटमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे, ज्यात शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, हेमा मालिनी, मोहनलाल, अल्लू अर्जुन आणि रजनीकांत यांचा समावेश आहे.

वेव्स समिट २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच महान व्यक्तींच्या सन्मानार्थ विशेष पोस्टाचे तिकिट जाहीर केले. तसेच त्यांनी 'वेव्स पुरस्कारांची' घोषणा केली जी कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातील देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत संगीताचे नवे केंद्र बनत आहे. जसे आपले जेवण जगभर आवडते, तसेच आपले संगीतही जागतिक ओळख निर्माण करत आहे.

राज कपूर, एस.एस. राजामौलींचे चाहते झाले पंतप्रधान मोदी

याशिवाय, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर यांचे कौतुक करताना सांगितले की ते जपानमध्ये खूप लोकप्रिय होते. यासोबतच त्यांनी चित्रपट बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांचेही कौतुक केले.

PREV

Recommended Stories

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!