'माझ्या अंगात भूत आलं होतं!' विमानात इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, प्रवासी अटकेत

Published : Mar 30, 2026, 08:32 AM IST
Passenger Tries to Open IndiGo Flight Emergency Exit

सार

Passenger Tries to Open IndiGo Flight Emergency Exit : बंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाने दोन वेळा इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. विमान लँड होताच त्याला अटक करण्यात आली.

Passenger Tries to Open IndiGo Flight Emergency Exit : बंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाने चक्क दोन वेळा इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. जेव्हा त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने 'माझ्या अंगात भूत आलं होतं' असं अजब उत्तर दिलं. मोहम्मद अफगाण असं या प्रवाशाचं नाव असून तो उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील रहिवासी आहे. वाराणसीमध्ये विमान उतरताच त्याला अटक करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

इंडिगोचं 67-185 हे विमान शनिवारी रात्री 8:15 वाजता बंगळुरूहून वाराणसीसाठी निघालं. विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत या व्यक्तीने इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच विमान कर्मचाऱ्यांनी त्याला तसं न करण्याची ताकीद दिली. त्यानंतर तो शांत बसला. पण रात्री 10.20 च्या सुमारास, जेव्हा विमान लँडिंगच्या तयारीत होतं (जमिनीपासून फक्त 500 फूट उंचीवर), तेव्हा त्याने पुन्हा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला.

त्याच्या या कृत्यामुळे विमानात गोंधळ उडाला आणि प्रवासी घाबरले. लगेचच पायलटकडे धोक्याचा इशारा गेला. त्यामुळे पायलटने काही वेळ विमान आकाशातच फिरवलं आणि रात्री 10.35 वाजता सुरक्षित लँड केलं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता, 'मला काहीच माहीत नाही, माझ्या अंगात भूत आलं होतं,' असं उत्तर त्याने दिलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jantar Mantar Protest : १३ कोटी मतं गायब? 'मी जेलमध्ये जायला तयार' - अभिजित दीपके
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर काय आहेत? जाणून घ्या मुंबई-दिल्लीसह तुमच्या शहरातील आजच्या किंमती