narendra modi cabinet: 'या' खासदारांना दिल्लीतून आले फोन, मोदी 3.0 मंत्रिमंडळात होणार समावेश

narendra modi cabinet: 3.0 मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे.

 

narendra modi cabinet: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 40 जणांना मंत्री केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नागपुरातून निवडणूक जिंकून नितीन गडकरी पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत. गडकरी हे मोदी सरकारमध्ये सलग दोन वेळा मंत्री राहिले आहेत. जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे सदस्य आहेत. चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपीआरने बिहारमधील पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागा जिंकल्या होत्या. चिराग स्वतः हाजीपूरमधून निवडणूक जिंकली आहे.

आणखी वाचा :

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७.१५ वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, सकाळी राजघाट आणि अटल समाधीवर पोहोचून वाहिली श्रद्धांजली

 

Share this article