ऑलिंपिक विजेते नीरज चोप्रा यांनी दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी भारतीय जवानांच्या धैर्याचे आणि दृढतेचे कौतुक केले आहे. दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या आपल्या सैन्याचा आपल्याला अभिमान आहे. सर्वजण सुरक्षित राहोत, आपण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूया. जय हिंद, जय भारत, जय सैन्य असे ट्वीट केले आहे. नीरज चोप्रा हे भारतीय सैन्यातील ४थ्या राजपूत रायफल्स युनिटमध्ये असून २०१८ मध्ये त्यांना सुभेदार पदावर बढती मिळाली आहे.