Asianet News | Published : Jun 9, 2024 9:34 AM IST / Updated: Jun 09 2024, 08:00 PM IST

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा लाईव्ह LIVE : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ

सार

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. ज्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, त्यांना फोन केले जात आहेत.

07:46 PM (IST) Jun 09

निर्मला सितारमण यांनी कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

निर्मला सितारमण यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

07:43 PM (IST) Jun 09

शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

शिवराज सिंह चौहान यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

07:35 PM (IST) Jun 09

जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रपती भवनात घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

राष्ट्रपती भवनात जे. पी. नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे.

07:33 PM (IST) Jun 09

नितीन गडकरी यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

नितीन गडकरी यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

07:31 PM (IST) Jun 09

अमित शाह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

अमित शाह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

07:31 PM (IST) Jun 09

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ

07:27 PM (IST) Jun 09

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ

07:05 PM (IST) Jun 09

नितीश कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले

बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU अध्यक्ष नितीश कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

07:01 PM (IST) Jun 09

अमित शाह आणि योगी आदित्यनाथ राजभवनात दाखल

भाजपचे नवनिर्वाचित खासदार अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

06:59 PM (IST) Jun 09

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अजित पवार उपस्थित

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवार राष्ट्रपती भवनात पोहोचले.

06:57 PM (IST) Jun 09

अभिनेता शाहरुख खान आणि मुकेश अंबानी राष्ट्रपती भवनात

अभिनेता शाहरुख खान आणि उद्योगपती मुकेश अंबानी नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

06:54 PM (IST) Jun 09

गौतम अदानी आणि अभिनेता अक्षय कुमार पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी उपस्थित

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अभिनेता अक्षय कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पोहोचले आहेत.

06:27 PM (IST) Jun 09

राष्ट्रपती भवनात परदेशी पाहुण्यांची रेलचेल

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी, राष्ट्रपती भवनात परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे.

06:01 PM (IST) Jun 09

शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लोक राष्ट्रपती भवनात पोहोचू लागले.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लोक राष्ट्रपती भवनात पोहोचू लागले आहेत. पास दाखवून पाहुणे राष्ट्रपती भवनात जात आहेत. 8000 हून अधिक लोकांना आमंत्रित केले आहे.

05:23 PM (IST) Jun 09

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल दिल्लीत पोहोचले

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

05:23 PM (IST) Jun 09

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल दिल्लीत पोहोचले

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

04:58 PM (IST) Jun 09

चंद्राबाबू नायडू दिल्ली विमानतळावर पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी व नव्याने खासदार झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू दिल्ली विमानतळावर हजर झाले आहेत

04:29 PM (IST) Jun 09

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला खर्गे उपस्थित राहणार

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. पक्ष आणि मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी त्याच्या सहभागावर सस्पेंस होता.

04:18 PM (IST) Jun 09

नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

03:17 PM (IST) Jun 09

पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष

Narendra Modi Oath Ceremony : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कार्यालयात जल्लोष साजरा केला जात आहे. मोहोळांचे कुटुंबीयांनी थेट दिल्ली गाठलीय आणि पुण्यातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. फटाके फोडून फुग्यांची सजावट करण्यात आली आहे.

03:16 PM (IST) Jun 09

बुलढाणा फटाक्याची आतिषबाजी

Narendra Modi Oath Ceremony : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून सोबत बुलढाणा जिल्ह्याचे खा प्रतापरावं जाधव हे केंद्रीय मंत्रपदाची शपथ घेणार असल्याने बुलढाण्यात महायुती कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

03:13 PM (IST) Jun 09

शेख हसीना यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दिल्लीत आल्या आहेत. त्यांनी भारतरत्न आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

03:11 PM (IST) Jun 09

देश समृद्ध व्हावा अशी माझी इच्छा आहे, शपथविधी सोहळ्यावर अनिल कपूर यांची प्रतिक्रिया

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यावर अभिनेता अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले आहे की, "मला फक्त देशाचा विकास हवा आहे."

03:06 PM (IST) Jun 09

ठाण्यात श्रीकांत शिंदेंचे मंत्री म्हणून झळकले बॅनर

खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांचे भावी केंद्रीय मंत्री अशा आशयाचे फलक झळकले. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा असताना ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळच दिसून येत आहे. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्व द्रुतगती मार्गावर हे बॅनर लावण्यात आले आहेत