Motor Vehicle Act: दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा असून या गुन्ह्यासाठी कायद्यानुसार दंड आकारला जाऊ शकतो. अर्थात दंड टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे ही एक सामान्य चूक तर आहेच, शिवाय ती बेकायदेशीर आणि जीवघेणी देखील आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, यासाठी 1,000 रुपये दंड आहे. हा नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे.
22
वाहतूक पोलिसांचा दंड
दंड ही एकमेव शिक्षा नाही. मात्र तिघांच्या प्रवासामुळे वाहनाचा तोल जातो आणि अपघात होऊ शकतो. तुमची आणि इतरांची सुरक्षा महत्त्वाची आहे, म्हणून दुचाकीवर नेहमी दोघांनीच प्रवास करा.