
इंदूर : राजा रघुवंशी यांचा लग्नाच्या १२ व्या दिवशी हनिमून डेस्टिनेशनवर झालेला खून आता एक हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्री बनला आहे. पत्नी सोनमसोबत मेघालयात हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी यांच्या हत्येने केवळ देशालाच हादरवून सोडले नाही, तर या हत्याकांडाने पोलिसांनाही धडकी भरवली आहे. या प्रकरणात आता नवे पात्र, कटकारस्थान आणि धक्कादायक ट्विस्ट समोर येत आहेत.
मावलाखियात (Mawlakhiat) गावातील स्थानिक मार्गदर्शक अल्बर्ट पीडी यांनी पोलिसांना दिलेल्या साक्षीने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले. २३ मे रोजी सकाळी १० वाजता त्याने राजा आणि सोनमला तीन अनोळखी पुरुषांसोबत पाहिले, जे हिंदीत बोलत होते. पोलिसांना या साक्षीनंतर खात्री पटली की सोनम आणि राजा सोबत असलेले लोक स्थानिक नव्हते. इथूनच पोलिसांना तीन नवीन संशयितांचा शोध सुरू झाला.
पोलिसांनी आतापर्यंत विकी, आकाश आणि आनंद या तीन तरुणांना अटक केली आहे. चौकशीत समोर आले आहे की सोनम रघुवंशीने त्यांना राजाची हत्या करण्यासाठी हायर केले होते. या भयानक कटकारस्थानामागे सर्वात धक्कादायक नाव आहे ते म्हणजे राज कुशवाहा. पोलिसांचा दावा आहे की राज कुशवाहा हा सोनमचा प्रियकर आहे आणि या खुनाचा मास्टरमाइंड सुद्धा आहे.
सोनमची कहाणी तेव्हा अधिक गुंतागुंतीची झाली जेव्हा ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर तापाने फणफणलेली आणि तणावात सापडली. मेघालय पोलिस म्हणतात, की सोनमने आत्मसमर्पण केले. उत्तर प्रदेश पोलिस म्हणतात, की आम्ही तिला शोधले. ९ जून रोजी तिला ताब्यात घेण्यात आले आणि २४ तासांतच तिला 'प्रमुख संशयित' घोषित करण्यात आले.
राजाच्या आईने सांगितले, की सोनमने संपूर्ण हनिमूनचे नियोजन केले होते. पण परतीचे तिकीट बुक केले नव्हते. तिने माझ्या मुलाला १० लाखांचे दागिने घालायला भाग पाडले होते.
पोलिसांच्या मते, सोनम आपल्या जुन्या प्रियकर राज कुशवाहासोबत आयुष्य घालवू इच्छित होती. म्हणूनच लग्नाच्या एका आठवड्यातच तिने आपल्या पतीला मारले. एसआयटी चौकशी सुरू आहे. तीन गुंड, प्रियकर आणि आता पत्नी तुरुंगात आहेत. पण प्रश्न अजूनही बाकी आहेत...