Mansoon in Maharashtra: आज संपूर्ण राज्यात यलो अलर्ट, आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय

Published : Jun 17, 2024, 10:53 AM IST
chennai rain

सार

Mansoon in Maharashtra: राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Mansoon in Maharashtra: महाराष्ट्रात वेळाआधी दाखल झालेला मान्सून विदर्भात प्रवेश करण्यापूर्वी रेंगाळला होता. परंतु आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. विदर्भ अन् मराठवाड्यातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मुंबई हवामान विभागाने संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट दिला आहे. राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. मुंबई, पुणे शहरात सोमवारी सकाळापासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मराठवाडा, विदर्भात पाऊस

वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पेरणी झालेल्या हळद, कपाशी या पिकांना चांगला आधार मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात पाणी साठवण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जोरदार पावसाने शेती कामांना वेग येणार आहे. नांदेडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु पेरणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेड जिल्ह्यात केवळ 35 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. औंढानागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे त्या भागात खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. सोयाबीन, मूंग, उडीदसह कापसाची लावगड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

मुंबईत धरणांमध्ये 22.5% पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा कारणाऱ्या भातसा धारणमध्ये अवघा 22.5 % पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शहापुरातील धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. धारण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणी पाणीसाठा कमी झाला आहे. या भागात 10 ते 12 दिवस पाऊस झाला नाही तर मुंबईकारांवर पाणीसंकट ओढवू शकतो.

राज्यात 20 जूननंतर पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Vitamin D Deficiency : तुमच्यातही ही ५ लक्षणं दिसतायत? वेळीच सावध व्हा!
Gold Rate Today : १२ ऑक्टोबरचे सोन्या-चांदीचे दर जाहीर; मुंबई, दिल्लीत काय आहे भाव?