मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.यादव यांच्या 'या' योजनेचे युनिसेफने केले कौतुक

Published : Aug 18, 2024, 02:07 PM IST
NICEF appreciated the initiative of Chief Minister Dr Yadav

सार

युनिसेफने मध्य प्रदेशातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यास प्रोत्साहनासाठी 19 लाख मुलींच्या खात्यात 57.18 कोटी जमा केले. 

युनिसेफने मध्य प्रदेशातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. युनिसेफवरील पोस्टमध्ये, मुख्यमंत्र्यांनी किशोरवयीन मुलांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो.

 

 

युनिसेफच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी किशोरवयीन मुलांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो. रोख हस्तांतरण योजनेचा भाग म्हणून मध्य प्रदेशातील 19 लाख शालेय मुलींच्या खात्यात 57.18 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.

UNICEF India शालेय स्वच्छता आणि मासिक पाळी आरोग्य जागृतीसाठी भारत सरकार आणि भागधारकांसोबत काम करत आहे. असे युनिसेफने पोस्टमध्ये म्हटले आहे.

11 ऑगस्ट रोजी भोपाळ येथे आयोजित विद्यार्थिनींच्या संवाद व सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी समग्र शिक्षा सेनिटेशन आणि हाईजीन योजनेंतर्गत 19 लाख विद्यार्थिनींच्या खात्यात 57 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम वर्ग केली होती.

सेनिटेशन आणि हाईजीन योजनेंतर्गत इयत्ता 7 ते 12 वीच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. योजनेंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली जाते. शालेय शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!