Lok Sabha Elections 2024 Results : तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन होणार, इंडिया आघाडीची देशात उत्तम कामगिरी

सार

Lok Sabha Elections 2024 Results : 1 जूनला लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान पार पडले. अशातच आज (4 मे) निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्याचे पाहिले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा येणार असून एनडीला 300-350 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ ठरू शकते. पण महायुतीच्या जागा कमी होतील असा अंदाज आहे.

09:41 PM (IST) Jun 04

तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन होणार, गठबंधनला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

18व्या लोकसभा निवडणुकीचे निकास जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने पूर्ण बहुमत मिळवले आहे. एनडीएला 291 जागा मिळाला आहेत. तर इंडिया आघाडीला 234 जागांवर विजय मिळवता आला आहे. यंदाच्या वेळी 96.88 कोटी मतदारांपैकी 64.2 कोटी मतदारांनी मतदान करत रेकॉर्ड केला आहे.

08:03 PM (IST) Jun 04

सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत सुरु असलेल्या पत्रकार परिषदेवेळी म्हटले आहे. याशिवाय उद्या इंडिया आघाडीचा नेता ठरला जाईल असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

07:56 PM (IST) Jun 04

मुंबई उत्तर पश्चिम येथून महायुतीचे रविंद्र वायकर येथून 48 मतांनी विजयी

मुंबई उत्तर पश्चिम येथून महायुतीचे रविंद्र वायकर येथून 48 मतांनी विजयी झाले आहेत. 

07:54 PM (IST) Jun 04

उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवसेना भवनात दाखल

उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. येथूनच उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 

07:48 PM (IST) Jun 04

भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही

भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. 

07:46 PM (IST) Jun 04

नागरिकांनी खरी शिवसेना कोणती हे दाखवून दिलेय - अरविंद सावंत

उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने देण्यात आली होती. नागरिकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत खरी शिवसेना कोणती हे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया युबीटी नेने अरविंद सावंत यांनी दिली आहे.

07:33 PM (IST) Jun 04

उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे निघण्यासाठी वांद्रे येथून रवाना

उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे निघण्यासाठी वांद्रे येथून रवाना झाले आहेत. खरंतर, शिवसेनेचा महाराष्ट्रात विजय झाल्याचा उत्साह प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. 

07:30 PM (IST) Jun 04

जनतेने एनडीवर तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या जनतेने एनडीएवर तिसऱ्यांदा विश्वास दर्शवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

 

07:10 PM (IST) Jun 04

महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर पश्चिम मुंबईतील निकाल येणे बाकी

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी केवळ आता बीड आणि उत्तर पश्चिम मुंबईतील निकाल येणे बाकी राहिले आहे. 

07:05 PM (IST) Jun 04

जालन्यात भाजपाच्या रावसाहेब दानवांचा दारुण पराभव

जालन्यात 35 वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळला आहे. येथून निवडणुकीचे तिकीट देण्यात आलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहेय 

06:57 PM (IST) Jun 04

अहमदनगर येथून महाविआचे निलेश लंके विजयी

अहमदनगर येथून महाविआचे निलेश लंके विजयी झाले आहेत. 

06:53 PM (IST) Jun 04

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पोस्टल मतदानांची मतमोजणी सुरु

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पोस्टल मतदानांची मतमोजणी सुरु झाली आहे. 

06:44 PM (IST) Jun 04

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विजयाची अधिकृत घोषणा

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

06:32 PM (IST) Jun 04

विदर्भात एनडीएची 9 जागांवरुन 2 जागांवर घरसण

विदर्भात एनडीएची 9 जागांवरुन 2 जागांवर घरसण झाली आहे.

06:30 PM (IST) Jun 04

उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर विजयाचा जल्लोष साजरा

उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह विजयी उमेदवार मातोश्रीवर पोहोचले आहेत. 

06:12 PM (IST) Jun 04

हातकणंगले येथील महायुतीचे धैर्यशील माने यांचा विजय

हातकणंगले येथील महायुतीचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे. 

05:30 PM (IST) Jun 04

सोलापूर येथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय

सोलापूर येथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे. 

05:08 PM (IST) Jun 04

रत्नागिरी येथे नारायण राणे यांचा विजय

रत्नागिरी येथे नारायण राणे विजयी झाले आहेत. 

04:59 PM (IST) Jun 04

रायगड येथून सुनील तटकरे विजयी

रायगड येथून सुनील तटकरे विजयी झाले आहेत. 

04:53 PM (IST) Jun 04

उत्तर मध्य मुंबई येथून वर्षा गायकवाड विजयी

उत्तर मध्य मुंबई येथून वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्वल निकम उभे होते तर त्यांचा आता पराभव झाला आहे.

04:41 PM (IST) Jun 04

ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आहे. 

03:57 PM (IST) Jun 04

रावेर येथून भाजपाच्या रक्षा खडसे विजयी

रावेर येथून भाजपाच्या रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत. 

03:56 PM (IST) Jun 04

शिरुर येथून डॉ. अमोल कोल्हे विजयी

शिरुर येथून डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. 

03:54 PM (IST) Jun 04

जळगावमधील भाजपच्या स्मिता वाघ विजयी

जळगावमधील भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. 

03:53 PM (IST) Jun 04

नागपूर येथून नितीन गडकरी विजयी

नागपूर येथून नितीन गडकरी विजयी झाले आहेत. यामुळे भाजपाचा मोठा विजय नागपुरात झाल्याचे मानले जात आहे.

03:52 PM (IST) Jun 04

मुंबई उत्तर पश्चिम येथून अमोल किर्तिकर 2 हजार मतांनी विजयी

मुंबई उत्तर पश्चिम येथून अमोल किर्तिकर 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. 

03:44 PM (IST) Jun 04

पुणे येथून भाजपाचे उमेदवार मुलरीधर मोहोळ विजयी

पुणे येथून भाजपाचे उमेदवार मुलरीधर मोहोळ विजयी झाले आहेत. 

03:43 PM (IST) Jun 04

कल्याण येथून श्रीकांत शिंदे विजयी

कल्याण येथून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. 

03:43 PM (IST) Jun 04

बारामतीत सुप्रिया सुळे विजयी

बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या असून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाले आहेत. 

03:38 PM (IST) Jun 04

मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर जल्लोषाला सुरुवात

उद्धव ठाकरे गटातील अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचा विजय झाल्याने मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर जल्लोषाला सुरुवात झाली आहे. 

03:34 PM (IST) Jun 04

शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरेंचा 57 हजार मतांनी विजय

शिर्डीत महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरेंचा 57 हजार मतांनी विजय झाला आहे. 

03:31 PM (IST) Jun 04

कोल्हापूर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा विजय

कोल्हापूर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा विजय झाला आहे. शाहू महाराज यांच्या विरोधात निवडणूक लढलेले शिंदे गटाचे संजय सदाशिव मंडलिक यांचा पराभव झाला आहे. 

03:13 PM (IST) Jun 04

नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत चर्चा झाली नाही- शरद पवार

नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेवेळी म्हटले आहे. याशिवाय आम्ही राष्ट्रपातळीवर उत्तम काम करतोय हे आम्हाला दिसून आल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 

03:06 PM (IST) Jun 04

दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. या मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी लढत होती. अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे यांच्या गटातील यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे. 

02:34 PM (IST) Jun 04

सांगली येथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

सांगली येथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 

02:32 PM (IST) Jun 04

उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय

उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. 

02:31 PM (IST) Jun 04

दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा विजय तर शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळेंचा पराभव

दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा विजय तर शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे. 

02:22 PM (IST) Jun 04

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांचा विजय

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. 

02:19 PM (IST) Jun 04

पालघर येथून भाजपाचे डॉ. हेमंत सावरा विजयी

पालघर येथून भाजपाचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे. 

02:15 PM (IST) Jun 04

रायगडमधील सुनील तटकरे 73 हजार मतांनी आघाडीवर

रायगडमधील सुनील तटकरे 73 हजार मतांनी आघाडीवर आहेत.