Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Updates : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क

सार

Third Phase Voting Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी आज (7 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 94 संसदेच्या जागांवर 7 मे ला मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, प्रल्हाद जोशी, सुप्रीया सुळेंसह अन्य बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. यावेळी बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालासारख्या काही प्रमुख राज्यांमध्ये मतदान होणार आहे.

06:02 PM (IST) May 07

EVM मशीनची केली पूजा केल्याने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

EVM मशीनची केली पूजा केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

05:33 PM (IST) May 07

देशात 50.71 टक्के मतदानाची नोंद

देशातील दुपारी तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी 42.63% मतदानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 63.11% मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये देखील 63.08 टक्के मतदान झालं आहे

03:03 PM (IST) May 07

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

02:14 PM (IST) May 07

महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झाले 31.55% मतदान

महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झाले 31.55% मतदान झाले आहे. 

02:08 PM (IST) May 07

लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या चरणासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92% मतदान झाले.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या चरणासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92% मतदान झाले.

01:54 PM (IST) May 07

गोवा येथील भाजप उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी मतदान केले आहे.

गोवा येथील भाजप उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी मतदान केले आहे.

11:33 AM (IST) May 07

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अहमदाबाद येथे बजावला मतदानाचा हक्क

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अहमदाबाद येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.  

10:32 AM (IST) May 07

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदानाचा हक्क कर्नाटकातील कलबुर्गी येथून बजावला आहे. कलबुर्गी येथून भाजपाने उमेश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात खरगेंच्या विरोधात उभे केले आहे. 

10:16 AM (IST) May 07

कर्नाटकातील भाजपाचे नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

कर्नाटकातील भाजपाचे नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे. 

09:51 AM (IST) May 07

बारामती येथील शरद पवारांच्या गटातील उमेदवार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या गटातील उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मतदान केले आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.

09:49 AM (IST) May 07

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57 टक्के मतदान

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57 टक्के मतदान झाले आहे.

  • आसाम - 10.12 टक्के
  • बिहार - 10.03 टक्के
  • छत्तीसगड - 13.24 टक्के
  • दादरा नगर हवेली आणि दमण-दीव - 10.13 टक्के
  • गोवा - 12.35 टक्के
  • गुजरात - 9.87 टक्के
  • कर्नाटक - 9.45 टक्के
  • मध्य प्रदेश - 14.22 टक्के
  • महाराष्ट्र - 6.64 टक्के
  • उत्तर प्रदेश - 11.63 टक्के
  • पश्चिम बंगाल - 14.60 टक्के

 

09:43 AM (IST) May 07

केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले मतदान

केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातील भाजपा उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मतदान केले आहे. 

 

09:17 AM (IST) May 07

अमित शाहांनी सपत्नीक अहमदाबादमधील कामेश्वर महादेव मंदिरात केली पूजा

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्नीसह अहमदाबादमधील कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली.

 

09:08 AM (IST) May 07

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पत्नी आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदान केले आहे. यावेळी अजित पवारांची आई आशा पवारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

09:06 AM (IST) May 07

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. बारामती येथून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामती मधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.

08:42 AM (IST) May 07

अभिनेता रितेश देशमुख याने लातूर येथे केले मतदान

अभिनेता रितेश देशमुखने मुंबईहून लातूर येथे दाखल होत मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर रितेशने म्हटले की, प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सर्वजण मतदान करतील असा विश्वास आहे.

08:39 AM (IST) May 07

मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी परिवारासह केले मतदान

मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी परिवारासह मतदान केले आहे. 

08:20 AM (IST) May 07

उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मतदान केले आहे. 

08:14 AM (IST) May 07

माझ्या कामावर विश्वास असल्याने नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मला पाठिंबा दिलाय - काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे

सोलापूर मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत होती. यावेळी कळले की, भाजपावर नागरिक संतप्त असून त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. मी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. माझ्या कामावर विश्वास असल्याने नागरिकांनी मला पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदान केल्यानंतर दिली आहे.

08:01 AM (IST) May 07

सोलापूर मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले मतदान

काँग्रेसच्या सोलापूर मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मतदान केले आहे. सोलापूर येथून भाजपाने राम विठ्ठल सातपुते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

 

07:49 AM (IST) May 07

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे केले मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे मतदान केले आहे. 

07:38 AM (IST) May 07

बारामतीमधील आमच्या उमेदवाराला जनतेचा पाठिंबा मिळेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच उमेदवारांसाठी केलेल्या प्रचारामुळे त्यांना विश्वास आहे की, आपलाच उमेदवार निवडणुकीत जिंकेल. ही तर सुरुवात आहे. मला खात्री आहे आमच्या उमेदवाराला जनता पाठिंबा देईल. ही निवडणूक बारामतीच्या विकासासाठी असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

07:33 AM (IST) May 07

काँग्रेस नेते अमित देशमुख आणि पत्नी अदिती देशमुख यांनी लातूरमध्ये केले मतदान

काँग्रेस नेते अमित देशमुख आणि पत्नी अदिती देशमुख यांनी लातूरमधील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

07:29 AM (IST) May 07

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज भवनात दाखल, अहमदाबमध्ये करणार मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज भवनात दाखल झाले आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात आज मतदान करणार आहेत.

07:26 AM (IST) May 07

भोपाळमधील खजुराहो मतदारसंघातील भाजपचे उमेदवार वीडी शर्मा यांनी केले मतदान

भोपाळमधील खजुराहो मतदारसंघातील भाजपचे उमेदवार वीडी शर्मा यांनी मतदान केले आहे.

07:13 AM (IST) May 07

मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडत मतदान करण्याचे काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे आवाहन

मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडत मतदान करण्याचे आवाहन काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केले आहे. 

07:10 AM (IST) May 07

मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

देशातील 12 राज्यांसह केंद्रशासित प्रदेश मिळून 94 मतदारसंघात आज (07 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 


More Trending News