Asianet News | Published : Apr 25, 2024 6:24 PM IST / Updated: Apr 26 2024, 07:39 PM IST

Lok Sabha Election 2024 Second Phase Voting Updates : महाराष्ट्रात सर्वाधिक कमी 41 टक्के तर मणिपूर येथे सर्वाधिक 68.92 टक्के मतदान

सार

Secound Phase Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 13 राज्यांसह 89 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, त्रिपुरासह मणिपुरमधील एक भाग मणिपुरच्या बाहेरील जागेचा समावेश आहे.  दरम्यान, वर्ष 2019 मध्ये याच 88 जागांपैकी 52 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. याशिवाय काँग्रेसला 18 आणि शिवसेना व जेडीयूला चार-चार जागांवर विजय मिळवता आला होता. या व्यतिरिक्त 10 जागा अन्य खात्यात केल्या होत्या.

07:39 PM (IST) Apr 26

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्रिपुरात 77.53 टक्के तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 77.53 टक्के मतदानासह त्रिपुरा आघाडीवर होते तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान झाले 

05:48 PM (IST) Apr 26

बीजेडी नेते व्हीके पांडियन यांची निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने केली कसून तपासणी

बीजेडी नेते व्हीके पांडियन नबरंगपूरमध्ये आले असता निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने त्यांची कसून तपासणी केली. 

05:29 PM (IST) Apr 26

त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान

त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान झाले. 

05:09 PM (IST) Apr 26

आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू, राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला विश्वास

आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू असा विश्वास राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य असताना त्यांनी लूट केल्याचा दावा केला आहे. 

04:45 PM (IST) Apr 26

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंतचे मतदान

  • आसाम 60.32 टक्के
  • बिहार 44.24 टक्के
  • छत्तीसगढ 63.92 टक्के
  • जम्मू-काश्मीर 57.76 टक्के
  • कर्नाटक 50.93 टक्के
  • मध्य प्रदेश 46.50 टक्के
  • महाराष्ट्र 43.01 टक्के
  • मणिपूर 68.48 टक्के
  • राजस्थान 50.27 टक्के
  • त्रिपुरा 68.92 टक्के
  • उत्तर प्रदेश 44.13 टक्के
  • पश्चिम बंगाल 60.60 टक्के

 

04:12 PM (IST) Apr 26

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.

04:08 PM (IST) Apr 26

मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान

मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान झाले आहे. 

03:42 PM (IST) Apr 26

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी केले मतदान

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी मतदान केले आहे. 

 

03:04 PM (IST) Apr 26

दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल- माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा

दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा यांनी व्यक्त केला आहे.

02:42 PM (IST) Apr 26

माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी केले मतदान

माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी मैसूर येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर जवागल श्रीनाथ यांनी म्हटले की, “घराबाहेर पडून मतदान करणे आपला हक्क आहे. यामुळे नागरिकांनी मतदान करावे. आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. मतदान करणे फार महत्त्वाचे आहे.”

02:09 PM (IST) Apr 26

महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.77 टक्के मतदान

आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशातच दुपारी 1 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पाहा-

  • आसाम 46.31 टक्के
  • बिहार 33.80 टक्के
  • छत्तीसगढ 53.09 टक्के
  • जम्मू-काश्मीर 42.88 टक्के
  • कर्नाटक 38.23 टक्के
  • केरळ 39.26 टक्के
  • मध्य प्रदेश 38.96 टक्के
  • महाराष्ट्र 31.77 टक्के
  • मणिपूर 54.26 टक्के
  • राजस्थान 40.39 टक्के
  • त्रिपुरा 54.47 टक्के
  • उत्तर प्रदेश 35.73 टक्के
  • पश्चिम बंगाल 47.29 टक्के

01:17 PM (IST) Apr 26

अभिनेता यश याने बंगळुरुत केले मतदान

अभिनेता यश याने बंगळुरुत मतदान केले आहे. 

12:56 PM (IST) Apr 26

काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी केले मतदान

माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.

12:27 PM (IST) Apr 26

इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम येथे केले मतदान

तिरुवनंतपुरम येथे इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी लोकसभेसाठी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर सोमनाथ यांनी म्हटले की, “मतदान केल्याने आनंद होतोय. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा.”

12:17 PM (IST) Apr 26

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मतदारांनी मतदानासाठी फिरवली पाठ

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील शिरकापूर येथील पहासू ब्लॉकमधील अकरवास गावातील लोक मतदारांनी मतदानासाठी पाठ फिरवली आहे. एसडीएम शिकारपूर प्रियंका गोयल यांनी म्हटले की, एकही चांगला रस्ता तयार करण्यात आलेला नाही आणि तो पाण्याने भरला गेलाय. यामुळेच आम्ही मतदान करणार नाही. पण याआधी अशा प्रकारची तक्रार आली नसल्याचे प्रियंका गोयल यांनी म्हटले आहे.

11:50 AM (IST) Apr 26

माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी केले मतदान

माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी मतदान केले आहे. 

11:27 AM (IST) Apr 26

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी केले मतदान

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी मतदान केले आहे. 

11:13 AM (IST) Apr 26

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी गौतम बुद्ध नगर येथे केले मतदान

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे मतदान केले आहे. 

10:56 AM (IST) Apr 26

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केले मतदान

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी म्हटले की, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी यावे. लोकशाहीच्या प्रक्रियेत योगदान द्या आणि मतदान करा. कारण मजबूत सरकार आणण्यासाठी तुमचे मत फार महत्त्वाचे आहे.

10:41 AM (IST) Apr 26

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले मतदान

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुंडी गावातील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.

10:35 AM (IST) Apr 26

अमरावतीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी केले हनुमान चालीसाचे पठण- खासदार नवनीत राणा

अमरावतीमधील भाजपचे उमेदवार नवनीत रवी राणा यांनी म्हटले की, "अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मी हनुमान चालिसाचे पठण केले, माझ्या कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले... माझ्या अमरावतीमधील नागरिकांना हे माहीत आहे की मतदान भारतासाठी आहे आणि ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला 100 टक्के आशीर्वाद देतील."

10:18 AM (IST) Apr 26

काँग्रेस खासदार आणि उमेदवार तिरुवनंतपुरम शशी थरूर यांनी केले मतदान

काँग्रेस खासदार आणि उमेदवार तिरुवनंतपुरम शशी थरूर यांनी मतदान केले आहे. शशी थरूर यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रसेकर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 

10:08 AM (IST) Apr 26

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी केले मतदान

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केले आहे. 

09:50 AM (IST) Apr 26

राजस्थानमधील कोटा येथील भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांनी केले मतदान

राजस्थानमधील कोटा येथील भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांनी शक्ती नगर परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. ओम बिर्ला यांच्या विरोधात प्रल्हाद गुंजाळ निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

09:28 AM (IST) Apr 26

केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार शोभा करंदलाजे यांनी बंगळुरुत केले मतदान

केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार शोभा करंदलाजे यांनी बंगळुरुत मतदान केले आहे. मतदानानंतर शोभा करंदलाजे यांनी म्हटले की, देशाच्या सुरक्षितता आणि विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे. आम्ही आज सण साजरा करत आहोत. आमचा येथून मोठ्या फरकाने विजय होईल. बंगळुरु नॉर्थमध्ये शोभा करंदलाजे यांच्या विरोधात राजीव गोवडा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

09:16 AM (IST) Apr 26

क्रिकेटर राहुल द्रविडने बंगळुरुत केले मतदान

क्रिकेटर राहुल द्रविडने कर्नाटकातील बंगळुरुत मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर राहुल द्रविडने म्हटले की, "सर्वांनी घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे. लोकशाहीसाठी ही एक संधी आहे."

08:41 AM (IST) Apr 26

भाजपाचा पुन्हा विजय होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- वसुंधरा राजे

राजस्थानमधील भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी मतदान केल्यानंतर म्हटले की, “आपण यावेळी ज्या प्रकारचे मतदान पाहत आहोत त्यावरून कळते भाजपाचा पुन्हा विजय होईल. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. झालावार मतदारसंघातील आमचे उमेदवार धनुष्य सिंग यांना उत्तम पाठिंबा मिळेल आणि आमचा ऐतिहासिक विजय होईल.”

08:24 AM (IST) Apr 26

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बंगळुरुत केले मतदान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बंगळुरुत मतदान केले आहे. कर्नाटकात लोकसभेच्या 14 जागांसाठी मतदान पार पडत आहे.

08:23 AM (IST) Apr 26

केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले मतदान

केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मतदान केले आहे. 

08:11 AM (IST) Apr 26

जालोरे लोकसभेच्या जागेवरील काँग्रस नेते वैभव गहलोत यांनी केले मतदान

जालोरे लोकसभेच्या जागेवरील काँग्रस नेते वैभव गहलोत यांनी मतदान केले आहे. वैभव गहलोत यांनी म्हटले की, आम्ही संपूर्ण कुटुंबाने मतदान केले आहे. मी नागरिकांना विनंती करतो की, त्यांनीही मतदान करावे.

07:58 AM (IST) Apr 26

अभिनेते प्रकाश राज यांनी बंगळुरुतील मतदान केंद्रावर केले मतदान

अभिनेते प्रकाश राज यांनी बंगळुरुतील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

07:42 AM (IST) Apr 26

राजस्थानमधील भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी केले मतदान

राजस्थानमधील भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी झालावार मतदान केंद्रावर मतदान केले आहे. राजस्थानमधील 13 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे.

07:32 AM (IST) Apr 26

केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनी केले मतदान

केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एर्नाकुलम येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

07:23 AM (IST) Apr 26

त्रिशूर येथील NDA मधील उमेदावर सुरेश गोपी यांनी केले मतदान

केरळातील 20 मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. त्रिशूर येथील एनडीएमधील नेते सुरेश गोपी यांनी मतदान केले आहे.

07:20 AM (IST) Apr 26

इन्फोसिस कंपनीचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्यासह पत्नी सुधा मूर्तींनी केले मतदान

इन्फोसिस कंपनीचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्तींसह कर्नाटकात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर सुधा मूर्तींनी म्हटले की, मी सर्वांना सांगू इच्छिते घरी बसून नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा, तुमचा नेता निवडा. मला नेहमी वाटतं की ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत शहरातील नागरिक कमी मतदान करतात. मी तरुणांना विनंती करते की बाहेर या आणि मतदान करा."

07:10 AM (IST) Apr 26

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत म्हटले की, लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदारांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. जेवढे अत्याधिक मतदान होईल तेवढीच आपली लोकशाही मजबूत होईल. तरुण मतदारांसह देशातील स्रियांनाही विशेष आग्रह आहे की, मतदान करण्यासाठी पुढे यावे. तुमचे मत तुमचा आवाज आहे.

 

 

07:06 AM (IST) Apr 26

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. गुरुवारी प्रचार सभेच्या तोफा थंडावल्यानंतर आज देशातील 13 राज्यांमधील 89 मतदारसंघात मतदान सुरू झाले आहे. 


More Trending News