Asianet News | Published : Apr 18, 2024 10:47 AM IST / Updated: Apr 19 2024, 05:28 PM IST

Lok Sabha Election 2024 First Phase Voting Updates : पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण, मणिपूरमध्ये गोळीबार तर छिंदवाडा येथे दोन गटात हाणामारी

सार

First Phase Voting Live Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 102 मतदारासंघासाठी मतदान केले जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पाच लोकसभेच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीरमधील जितेंद्र सिंह, महाराष्ट्रातील नागपूर येथील नितीन गडकरी, उत्तर प्रदेशातील जतीन प्रसाद, तमिळनाडूतील ए राजा डीएमके, तमिळनाडूतील के अन्नामलाई, अरुणाचल प्रदेशातील किरेन रिजिजू, जोरहाट-आसाममधील गौरव गोगई आणि मध्य प्रदेशातील नकुल नाथ अशा बड्या नेत्यांसाठी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असणार आहे.

 

05:12 PM (IST) Apr 19

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण

देशातील 102 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही नागरिक मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर उभे असून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी दिली जात आहे. याशिवाय मणिपूर येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याने तीन जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथील मतदान केंद्रावर दगडफेक झाली. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील मतदान केंद्रावर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

04:55 PM (IST) Apr 19

तमिळनाडूत दुपारी 3 वाजेपर्यंत 51.41 टक्के मतदान, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

तमिळनाडूत दुपारी 3 वाजेपर्यंत 51.41 टक्के मतदान झाले आहे. यापैकी सर्वाधिक मतदान धर्मपुरी येथे 57.86 टक्के, नमक्कल येथे 57.67 टक्के झाले आहे. चेन्नई मध्य येथे 41.47 टक्के, चेन्नई दक्षिण येथे 42.10 टक्के, चेन्नई उत्तर येथे 44.84 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू यांनी दिली आहे.

04:50 PM (IST) Apr 19

मणिपूरमधील इंफाल पूर्वमध्ये मतदान पूर्ण, ईवीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सील करण्याचे काम सुरू

मणिपूरमधील इंफाल पूर्वमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. येथे सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. आता मतदान केंद्रामधील ईवीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सील करण्याचे काम सुरू झाले आहे. 

04:23 PM (IST) Apr 19

तमिळनाडू येथे दुपारी 3 वाजेपर्यंत 45.3 टक्के मतदान

तमिळनाडू येथे दुपारी 3 वाजेपर्यंत 45.3 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 51.41 टक्के मतदारांनी तमिळनाडूत मतदान केले आहे.

04:16 PM (IST) Apr 19

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. 

  • नागपूर 40.10 टक्के
  • रामटेक 38.43 टक्के
  • चंद्रपूर 43.48 टक्के
  • भंडारा-गोंदिया 46 टक्के
  • गडचिरोली-चिमूर 55.79 टक्के

03:44 PM (IST) Apr 19

नारायण राणे यांचा निवडणुकीत विजय होईल - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले की, "मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होते. महायुतीतील नेतेमंडळीही उपस्थितीत होती. उमेदवारी अर्ज भरताना सर्वत्र उत्साह होता. मला विश्वास आहे, नारायण राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून विजय होईल."

03:16 PM (IST) Apr 19

जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका होतायात- ओमर अब्दुल्ला

ऑगस्ट 2019 नंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाने काश्मीरमधील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अशातच गृहमंत्री म्हणतायत आधी ते नागरिकांची मन जिंकतील आणि नंतर निवडणूक लढवतील. याचा अर्थ असा होतो की, त्यांना नागरिकांची मने जिंकता आली नाही असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

02:19 PM (IST) Apr 19

इंडिया आघाडीची जनतेत लाट - आरजेडी नेत्या मिसा भारती

बिहारमधील पटना येथील पाटलीपुत्रच्या आरजेडी पक्षाच्या नेत्या मिसा भारती यांनी म्हटले की, इंडिया आघाडीची लाट जनतेत आहे. आम्ही जनतेमध्ये गेलो असता त्यांनी एनडीएने आमच्यासाठी काहीही केले नसल्याचे सांगितले. एनडीए नेहमीच बेरोजगारी, शेतकऱ्यांना मिळणारी कमाई दुप्पट होईल असे म्हणतात पण खरंतर असे काहीही झालेले नाही.

02:07 PM (IST) Apr 19

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे अशी राजस्थानमधील जनतेची इच्छा - मुख्यमंत्री भजनलाल शर्मा

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी म्हटले की, आज 12 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे अशी इच्छा आहे. राजस्थानमधील सर्व 25 जागांवर भाजपचा विजय होईल असेही भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे.

01:45 PM (IST) Apr 19

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले मतदान

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राजस्थानमधील जयपुर येथे मतदान केले आहे.

01:38 PM (IST) Apr 19

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या उमेदवार इराक हसन यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या उमेदवार इराक हसन यांनी मतदान केले आहे. 

01:20 PM (IST) Apr 19

अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल डीके जोशी यांनी पोर्ट ब्लेअरमधील मतदान केंद्रावर केले मतदान

अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल डीके जोशी (निवृत्त) यांनी पोर्ट ब्लेअरमधील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

01:09 PM (IST) Apr 19

अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य सचिव केशव चंद्र यांनी पोर्ट ब्लेअर येथील मतदान केंद्रावर केले मतदान

अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य सचिव केशव चंद्र यांनी पोर्ट ब्लेअर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

12:51 PM (IST) Apr 19

उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बाबा रामदेव यांनी केले मतदान

उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बाबा रामदेव यांनी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी म्हटले की, “माझे मत भारताला आहे. माझे मत भारताला आजारमुक्त आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी आहे. मी भारतातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान केले आहे. मी मतदारांना आवाहन करतो की, घराबाहेर पडून मतदान करावे.”

12:48 PM (IST) Apr 19

केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे केले मतदान

केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे मतदान केले आहे. 

12:26 PM (IST) Apr 19

छत्तीसगढमधील बिजापूर येथे IED स्फोट, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट जखमी

छत्तीसगढमधील बिजापूर येथे आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला आहे. यावेळी इलेक्शन ड्युटीवर असलेले सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

12:10 PM (IST) Apr 19

मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी केले मतदान

मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मतदान केले आहे.

11:51 AM (IST) Apr 19

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारदरा येथे केले मतदान

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारदरा येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी म्हटले की, "पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान मोदींचे इंजिन अपयशी झाले असून नागरिकांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हवेय. याशिवाय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यातील पाचही लोकसभेच्या जागांवर निवडून येतील."

11:45 AM (IST) Apr 19

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नागपुरात केले मतदान

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी महाराष्ट्रातील नागपुर येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. 

11:24 AM (IST) Apr 19

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात केले मतदान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदान केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. यामुळे प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन करतो."

11:22 AM (IST) Apr 19

तुमचे प्रत्येक मत भ्रष्टाचार आणि परिवारावादाच्या विरोधातील असेल - जेपी नड्डा

तुमचे प्रत्येक मत भ्रष्टाचार आणि परिवारावादाच्या विरोधातील असेल असे जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. 

10:54 AM (IST) Apr 19

जगातील सर्वाधिक लहान उंची असणारी महिला ज्योती आमगे हिने नागपुरात केले मतदान

जगातील सर्वाधिक लहान उंची असणारी महिला ज्योती आमगे हिने नागपुरात मतदान केले आहे. 

10:41 AM (IST) Apr 19

अभिनेता विजय सेतूपती याने चेन्नईतील मतदान केंद्रवर केले मतदान

साउथ सिनेमातील अभिनेता विजय सेतूपती याने चेन्नईतील मतदान केंद्रवर मतदान केले आहे. 

10:26 AM (IST) Apr 19

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांनी कुटुंबासह केले मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांनी कुटुंबासह गोंदिया मतदार केंद्रावर मतदान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने देशाचा कल आहे. त्यांनी नेहमीच ज्या योजनांबद्दल आश्वासने दिली त्या पूर्ण करून दाखवल्याचेही प्रफुल्ल पटेलांनी म्हटले आहे.

 

10:24 AM (IST) Apr 19

अभिनेता आणि एमएनएम प्रमुख कमल हसन यांनी केले मतदान

अभिनेते आणि एमएनएम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान केले आहे.

10:00 AM (IST) Apr 19

प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 वर्षे देशातील जनतेची सेवा करताना पाहिलेय - राजस्थान उपमुख्यंत्री दिया कुमारी

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानसाठी मतदान केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना दिया कुमारी यांनी म्हटले की, “प्रत्येक व्यक्तीचा मोदींजीवर विश्वास आहे. त्यांच्या कामासह बोलवण्यावर विश्वास आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षे जनतेसाठी काम केल्याचे प्रत्येकाने पाहिलेय.”

09:56 AM (IST) Apr 19

अरुणाच प्रदेशात 6.44 तर सिक्कीमध्ये 7.90 टक्के मतदान

अरुणाच प्रदेशात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.44 तर सिक्कीमध्ये 7.90 टक्के मतदान करण्यात आले आहे. याशिवाय लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले आहे.

09:49 AM (IST) Apr 19

रामटेक येथे मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह, मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी

रामटेक येथे मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. खास गोष्ट म्हणजे, रामटेकमधील मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजवण्यात आले आहे. 

09:34 AM (IST) Apr 19

लोकशाहीचा आज उत्सव साजरा होतोय, मतदारांनी अधिकाधिक मतदान करण्याचे नितीन गडकरींचे आवाहन

केंद्रीय मंत्री आणि नागपूरमधील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी म्हटले की, आज लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय. यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. हा आपला मुलभूत अधिकार आणि काम आहे. तुम्ही कोणात्याही उमेदवाराला मतदान करू शकता. पण मतदान करणे फार महत्त्वाचे आहे. मला 101 टक्के खात्री आहे की, माझा मोठ्या फरकाने विजय होईल. नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

09:21 AM (IST) Apr 19

सद्गगुरू जग्गी वासूदेव यांनी केले मतदान

सद्गगुरू जग्गी वासूदेव यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केले आहे.

 

 

09:04 AM (IST) Apr 19

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचे अरुणाचल प्रदेशातील नाब्रा येथे मतदान

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशातील नाब्रा येथे मतदान केले आहे. 

 

08:59 AM (IST) Apr 19

मतदानापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंदिरात केली पूजा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मतदानाआधी पुरणगिरी मंदिरात पूजा केली आहे.

08:36 AM (IST) Apr 19

काँग्रेसला निवडणुकीत 30 जागा सुद्धा मिळणार नाहीत- भाजप नेते अनिल बलुनी

उत्तराखंडातील पौरी गढवाल मतदारसंघातील भाजपचे नेते अनिल बलुनी यांनी म्हटले की, काँग्रेसला 30 जागा सुद्धा निवडणुकीत मिळणार नाहीत. काँग्रेसच्या इतिहासात त्यांना सर्वाधिक कमी जागा मिळतील असेही बलुनी यांनी म्हटले आहे.

08:23 AM (IST) Apr 19

कमलनाथ यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केला आनंद

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मतदान केले आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना छिंदवाडा येथून काँग्रेसने तिकीट दिले आहे.

08:20 AM (IST) Apr 19

साउथ सुपरस्टार रजनिकांत यांनी केले मतदान

साउथ सुपरस्टार रजनिकांत यांनी चेन्नईतील मतदान केंद्रावर आज होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केले आहे.

08:09 AM (IST) Apr 19

जनता सत्याची साथ देईल- नकुलनाथ

काँग्रेसचे छिंदवाडा येथील उमेदवार नकुलनाथ यांनी म्हटले की, जनता सत्याची साथ देईल. 44 वर्ष आम्ही सेवा केली आहे. यामुळे मला विश्वास आहे की, जनता त्यांचे संपूर्ण प्रेम आणि साथ आम्हाला देईल. 

08:01 AM (IST) Apr 19

तमिळनाडूतील भाजपचे प्रमुख आणि पक्षाचे उमेदवार के अन्नामलाई यांनी केले मतदान

तमिळनाडूतील कोयंबटुंर येथील भाजपचे उमेदवार के. अन्नामलाई यांनी मतदान केले आहे. उथ्थूपती येथील मतदान केंद्रावर अन्नामलाई यांनी मतदान केलेय.

07:39 AM (IST) Apr 19

एक मत सुरक्षित, विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवतो- अमित शाह

आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे, ज्यावेळी देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. कारण तुमच्या एका मतामध्ये सुरक्षित, विकसित आणि आत्मनिभर भारत तयार करण्याची शक्ती आहे. तुमचे एक मत केवळ लोकसभा अथवा उमेदावराचे निकाल ठरवणे नाही. तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. अशा आशयाचे ट्विट केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले आहे.

 

 

 

07:29 AM (IST) Apr 19

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिमा धानोरकर यांनी केले मतदान

आज होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रतिमा धानोरकर यांनी मतदान केले आहे. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिमा धानोरकर अशी लढत होणार आहे.

07:23 AM (IST) Apr 19

मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले की, वर्ष 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीला आजपासून सुरूवात होत आहे. 102 मतदारसंघामध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामुळे मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करावे.

 

 


More Trending News